Saturday, November 1, 2025

अंगावरची हळद ओली, सीमेवर हजर राहण्यासाठी जवानाला कॉल; नववधू म्हणाली ‘ऑपरेशन सिंदूर’साठी माझं कुंकू पाठवतेय!

लग्न झाल्यानंतर सर्वांना सुखी संसाराची आवड निर्माण होते. लग्नानंतर फिरायला जाणं, आपल्या आयुष्यभरच्या जोडीदारासोबत वैवाहिक जीवन सुखानं जगणं हे प्रत्येकाला आवडतं. मात्र जवान मनोज पाटील यांचं ५ मे रोजी लग्न झालं आणि ८ तारखेला त्यांना देशसेवेसाठी तात्काळ हजर राहण्याचा कॉल आला. कुठलाही विचार न करता मनोज पाटील यांच्या अंगावरची हळद ओली असतानाच हातावर रंगलेल्या मेहंदीसह जवान आज देशाच्या संरक्षणासाठी रवाना झाले.

देशात युद्धजन्य परिस्थिती असल्याने जवानांना त्वरित बोलावणं आलं आहे. जवानांनीही देशाच्या कर्तव्याला प्राधान्य देत तडक सीमेवर जाण्यासाठी निर्णय घेतला. लग्नाची मनोहर स्वप्नं, आयुष्यभराच्या जोडीदारासोबत फिरण्याचं नियोजन, भविष्याबाबतच्या कल्पना, या सर्व गोड क्षणांना तिलांजली देऊन सोमवारी ५ मे रोजी लग्न झालेला मनोज ज्ञानेश्वर पाटील (रा. खेडगाव नंदी) हा जवान हळदीचा रंग अंगावर असतानाच कर्तव्य बजावण्यासाठी आज सीमेवर रवाना झाला. पाचोरा तालुक्यातील नाचणखेडे येथील रामचंद्र पाटी यांची कन्या यामिनी हिच्याशी खेडगाव नंदीचे येथील ज्ञानेश्वर लुभान पाटील यांचा मुलगा मनोज यांचं लग्न ठरलं. लग्नासाठी सुट्टी घेऊन मनोज गावी आले होते. पाचोरा येथे लग्न सामारंभ आटोपत नाही, तोच मनोज यांना कर्तव्याच्या ठिकाणी त्वरित बोलावणं आलं आहे.

नाचणखेडे येथील रामचंद्र पाटील यांची कन्या यामिनी हिच्याशी खेडगाव नंदीचे येथील न्यानेश्वर पाटील यांचा मुलगा मनोज यांचं लग्न ठरलं. लग्नासाठी सुटी घेऊन मनोज गावी आलेले. पाचोरा येथे लग्न सामारंभ आटोपत नाही, तोच मनोज यांस कर्तव्याच्या ठिकाणी त्वरित बोलावणं आलं.

भारत आणि पाकिस्तान यांच्यात कोणत्याही क्षणी युद्धजन्य परिस्थिती निर्माण होऊ शकते. यामुळे जे जवान घरी सुट्टीसाठी आलेले, अशा सर्व जवानांना पुन्हा हजर राहण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार, जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील खेडगाव नंदीचे गावातील मनोज न्यानेश्वर पाटील यांचा नुकताच 5 मे रोजी विवाह संपन्न झाला होता. पण, विवाह झाल्यावर तात्काळ त्यांना सेवेमध्ये रुजू होण्याचे आदेश आले आहेत. मनोज यांनी आपल्या अर्धांगिनीला परत येण्याचा विश्वास देऊन देशाची सेवा करण्याचा मार्ग निवडला. देशसेवेसाठी अंगावरची ओली हळद आणि हातावर रंगलेली मेहंदी घेऊन मनोज आज आपल्या पोस्टिंगच्या ठिकाणी रवाना झाले. मनोज यांनी घेतलेल्या धाडसी निर्णयामुळे सर्वत्र कौतुक होत आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles