जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कारने या हल्ल्याला ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून प्रत्युंत्तर दिले आहे. ज्यामध्ये पाकिस्तान व पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त झाले आहेत. याचबरोबर १०० हून अधिक दहशतवादी मारले गेले आहेत. यानंतर काल रात्री पाकिस्तानने सीमा भागांत ड्रोन हल्ले करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.
यानंतर मुंबई शहरातही हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज मुंबईत उच्चस्तरीय सुरक्षा आढावा बैठक घेणार आहेत. वरिष्ठ पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार आहे.भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर मुंबई शहरातही हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज मुंबईत उच्चस्तरीय सुरक्षा आढावा बैठक घेणार आहेत. वरिष्ठ पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार आहे.


