भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये तणाव वाढताना दिसतोय. याचे परिणाम सोनं आणि चांदीच्या भावावर देखील पडताना दिसतायत. आज सोन्याच्या किमतीत घसरण झाली आहे. शुक्रवारी ९ मे २०२५ रोजी एकाच दिवसात सोन्याच्या किमतीत १,२५० रुपयांपर्यंत घट झाल्याचं दिसून आलं आहे.
सध्या लग्नसराईचे दिवस सुरु आहेत आणि या काळात बाजारात मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी केली जाते. अशातच आज २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमची किंमत ९८,५०० रुपये आहे. याशिवाय २२ कॅरेट सोन्याचा दर ९०,३०० रुपये आहे. देशातील मोठ्या शहरांमध्ये सोनं आणि चांदीचे दर काय आहेत ते जाणून घ्या.
दिल्ली आणि मुंबईमध्ये कसा आहे सोन्याचा दर
आज म्हणजेच शुक्रवारी ९ मे २०२५ रोजी दिल्लीत २२ कॅरेट सोन्याचा भाव ९०,३०० रुपये आहे. तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ९८,५०० रुपये प्रति १० ग्रॅम होता. मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ९०,१५० रुपये आणि २४ कॅरेट सोन्याचा भाव ९८,५०० रुपये प्रति १० ग्रॅम आहे.
कसा आहे आज चांदीचा भाव?
शुक्रवारी ९ मे २०२५ रोजी चांदीचा भाव ९९,००० रुपये प्रति किलो आहे. कालच्या तुलनेत आज चांदीच्या किमतीत घसरण झाली आहे. पाहूयात देशाीतल प्रमुख शहरांमध्ये कसा आहे आजचा सोन्याचा दर.
२२ कॅरेट सोन्याचा दर
दिल्ली-९०,३००
चेन्नई-९०,१५०
मुंबई-९०,१५०
कोलकाता-९०,१५०
जयपूर-९०,३००
नोएडा-९०,३००
२४ कॅरेट सोन्याचा दर
दिल्ली-९८,५००
चेन्नई-९८,३५०
मुंबई-९८,३५०
कोलकाता-९८,३५०
जयपूर-९८,५००
नोएडा-९८,५००


