धनंजय मुंडे भावनिक; जन्माला आलो तसं माझ्या पाठी संघर्ष, मी जन्मला आलो 4 महिने डोळेच उघडले नाहीत

राज्यात गेल्या वर्भरापासून बीड जिल्हा चांगलाच चर्चेत असून दिवंगत सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणानंर बीडचे तत्कालीन पालकमंत्री धनंजय मुंडेंना आपल्या मंत्रि‍पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यामुळे, गेल्या सव्वा वर्षापासून ते केवळ आमदार बनून कार्यरत आहेत. अनेकदा त्यांनी सार्वजनिक कार्यक्रम आणि जाहीर सभांची भाषणंही टाळल्याचं दिसून आलं. मंत्रिपद नसल्याची खंत त्यांच्या आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनाही सातत्याने वाटत आहे. त्याच अनुषंगाने बीडच्या भायाळा गावातील नारळी सप्ताहास धनंजय मुंडे यांनी मनातील खंत कार्यकर्त्यांपुढे बोलून दाखवली. जन्मापासून माझ्या पाठीशी संघर्ष असल्याचं त्यांनी म्हटलं. तसेच, गेल्या सव्वा वर्षे मी गप्प राहिलो, आपल्या गप्पा राहण्यातच एवढी ताकद आहे तर बोलल्यानंतर काय होईल, असेही धनंजय मुंडेंन म्हटले.

मंत्री पंकजा मुंडे यांनीही भायाळा येथील सप्ताहाच्या सांगतानिमित्ताने हजेरी लावली होती. गोपीनाथ मुंडे हे नाव जगाला विसरु देणार नाही, ही शपथ मी चितेवर खाल्ली आहे. गोपीनाथ मुंडे या नावाच्या संस्कारावर किती विश्वास आहे. माझ्या कातड्याचे जोडे केले आणि तुमच्या पायात घातले तरी ही फेड होणार नाही, असे भावनिक भाषण पंकजा यांनी केले. त्यानंतर, धनंजय मुंडेंनी देखील येथील व्यासपीठावरुन कार्यकर्त्यांना उद्देशून भावनिक भाषण केलं. धार्मिक व्यासपीठावरुन मी बोलणार नव्हतो पण महंतांनी आदेश दिल्यानंतर पाळावा लागतो म्हणून मी बोलतो, असे म्हणत धनंजय मुंडे यांनी गेल्या दीड वर्षातील घडामोडींवर भाष्य केलं. अनेक जणांनी माझ्या गेल्या सव्वा-दीड वर्षांपासून आलेल्या संकटाच्याबाबतीत आज आठवण काढली. धोंडेसाहेब अन् आपल्या सगळ्यांना मी सांगतोय, जसं जन्माला आलो तसं माझ्या पाठी संघर्षय, जन्माला आलो 4 महिने डोळेच उघडले नाहीत. जन्मत:च लिव्हरचा त्रास, कसा वाचलो देव जाणे. अनेकदा संकट आलं, पण तुमच्या आशीर्वादाने वेळ कधीच आली नाही. मी जन्माला आलो तेव्हापासून संघर्ष आहे. अनेक संकट आली पण तुमच्या आशीर्वादाने वेळ कधीच आली नाही.बोलणाऱ्यांना बोलू द्या, कुणी कितीही बोललं तरी मी सव्वा वर्ष गप्प राहिलो, अजिबात बोललो नाही. कारण, आपल्या गप्प राहण्यातच एवढी ताकद आहे, तर बोलल्यानंतर काय होईल? असेही धनंजय मुंडेंनी म्हटलं.

मी रथावर बसावं म्हणून एवढा आग्रह सगळ्यांचा होता, गाडीच्या आडवा झाला कार्यकर्ता. पण, याला कसं सांगावं. आरे रथावर घोड्याच्या बसावं लागतं, मोराच्या नाही. उदाहरण कर्णाचं दिलं पण माझं नाव अर्जुनाच्या एका नावातलं धनंजय आहे, असा राजकीय टोलाही धनंजय मुंडेंनी लगावला.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles