राज्यात गारपिट….. अहिल्यानगरसह 12 जिल्ह्यांना पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’

राज्याच्या काही भागात पावसासोबतच मोठी गारपीट होण्याचा अंदाज आहे, ज्यामुळे शेतीचे नुकसान होऊ शकते. पुढील 3 तासात मेघगर्जना, विजांचा कडकडाट राज्यात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ताशी ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याने अनेक भागात यलो अलर्ट देण्यात आला आहे. लातूर, परभणी, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यांत काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाच्या अंदाज पुणे हवामान खात्याने वर्तवला आहे. नागरिकांनी सतर्क राहून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.

कडाक्याच्या उन्हात पावसाने हजेरी लावल्याने पिकांचे मोठ्या प्रमामात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यांसमोर भाजी-पाला आणि फळे मातीमोल झाली आहे. त्यामुळे बळीराजा संकटात सापडलाय. अवकाळीचा फटक्याने राज्यात ६३ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान आकडा वाढण्याची शक्यता आहे.

राज्यात मार्चमधील अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीमुळे सुमारे ६२ हजार ९६९ हेक्टरवरील शेती व फळपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अहिल्यानगर आणि जळगाव जिल्ह्यांना सर्वाधिक फटका बसला आहे. एप्रिलमध्येही अवकाळी सुरू राहण्याची शक्यता असल्याने नुकसान वाढण्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.पुढील चार दिवस राज्यात मेघ गर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुढील चार दिवस विजांच्या कडकडाटसह पावसाची शक्यता आहे. चार दिवस पुणे शहराला येलो अलर्ट देण्यात आला आहे. शहर आणि परिसरात कमाल तापमान ३५ अंश सेल्सियस इतके नोंदवण्यात आले आहे. पुढील चार दिवस मात्र पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

अवकाळी पावसाने पुणेकरांना दिलासा मात्र अनेक ठिकाणी झाडपडी झाली आहे. पावसामुळे पुण्यात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. पुण्यात चाळीशीपार तापमानानंतर सोमवारी मेघगर्जना व वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली.

यात पाषाणमध्ये ४६ तर लोहगाव येथे ३८ मिमी पावसाची नोंद झाली. तर काही भागात गारांचा वर्षाव झाल्याने १४ ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्या परिणामी वाहतूक कोंडी आणि दुचाकी घसरण्याच्या घटना घडल्या.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles