अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील सोनई इथं धक्कादायक घटना घडली आहे. साठवण तलावात तीन लहान मुले बुडाल्याची घटना घडली आहे. 8 ते 12 वर्ष वयाची ही मुले पोहताना बुडाली आहेत. दुपारी तीन ते चार वाजण्याच्या दरम्यान ही दुर्घटना घडली आहे. पाण्याचा अंदाज न आल्याने ही दुर्घटना घडली आहे. दरम्यान, मुले बुडाल्याची माहिती मिळताच स्थानिक लोक एकत्र आले. त्यानंतर लगेच पोलीसही घटनास्खळी दाखल झाले आहेत. स्थानिक नागरिक आणि पोलीसांच्या मदतीने एकाचा मृतदेह बाहेर काढण्यात यश मिळालं आहे. आणखी दोन मुलांचा शोध सुरु आहे. पोलीस आणी बचावपथक घटनास्थळी दाखल झाले आहे. दरम्यान, या घटनेमुळं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोनई गावामध्ये राहणारे ३ मुलं पोहण्यासाठी साठवण तलावात पोहण्यासाठी गेले होते. तलावामध्ये पोहण्यासाठी त्यांनी उडी मारली. पण ते बाहेर आले नाहीत. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे त्यांचा बुडून मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने एका मुलाचा मृतदेह काढला आणि शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले.
दोन मुलांचे मृतदेह अद्याप सापडले नाही. पोलिस आणि स्थानिक या दोन्ही मुलांचा शोध घेत आहेत. सध्या घटनास्थळी बचावपथक देखील दाखल झाले आहे. त्यांच्याकडून देखील दोन्ही मुलांचे मृतदेह शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या घटनेनंतर तलावाजवळ गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली आहे. मृत्यू झालेले तिन्ही मुलं ८ ते १२ वयोगटातील आहेत. या घटनेमुळे अहिल्यानगरमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.


