भिगवण प्रकरणात पुन्हा ट्विस्ट, जहीर शेखने आपलं अपहरण केलं, मुलीची पोलिसात तक्रार दाखल

भिगवण अपहरण प्रकरणात पुन्हा एकदा मोठा ट्विस्ट आला असून मुलीने जहीर शेख या तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. जहीर शेखने आपलं अपहरण केल्याची तक्रार मुलीने दाखल केली आहे. या आधी याच मुलीने जहीर शेखसोबत प्रेमसंबंध असल्याचं सांगितलं होतं आणि स्वतःच्या मर्जीने त्याच्यासोबत गेल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर या मुलीने तिचा जबाब बदलला. आता जहीर शेख या तरुणावर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणातील तरुणीने तिच्या तक्रारीत म्हटलंय की, 17 फेब्रुवारीला आई सोबत आणि भावासोबत लग्नाची खरेदी करण्यासाठी गेली असताना आपलं अपहरण करण्यात आलं. यामध्ये तिने जहीर शेखचं नाव घेतलं आहे.

संबंधित तरुणीने एक प्रतिज्ञापत्र तयार केलं आहे. या प्रतिज्ञापत्रात माझं आणि त्याचं प्रेम होतं. मी हे घरच्यांना सांगितलं होतं. दुसऱ्या मुलांसोबत लग्नास माझा विरोध होता. त्यामुळे संबंधित मुलासोबत मी स्वतःच्या पळून गेलो, असं म्हटलं होतं. तसेच मिरचीपूड फेकल्याची जो गुन्हा दाखल केला आहे, तो खोटा असल्याचंही तरुणीने प्रतिज्ञापत्रात सांगितलं होतं.

दरम्यान, मुलगा आणि मुलगी भिगवममधून बाहेर पडल्यानंतर  श्रीगोंदा, अहिल्यानगर, शिक्रापूर, पुणे सासवड असा प्रवास करून महाबळेश्वरला गेले. महाबळेश्वरवरून मुलगी आणि मुलगा मध्यरात्री दीड वाजता बारामती शहर पोलीस ठाण्यात हजर झाले होते.

इंदापूर तालुक्यातील भिगवण येथील 21 वर्षीय तरुणीच्या कथित अपहरण प्रकरणाने  संबंधित तरुणी आपल्या आई आणि भावासह लग्नाच्या खरेदीसाठी गेली असताना, तिच्या आईच्या आणि भावाच्या डोळ्यात मिरची पूड टाकून तरुणीचं अपहरण केल्याची तक्रार करण्यात आली होती.

या प्रकरणी सुरुवातीला तरुणीने कोर्टात येऊन जबाब नोंदवला. आपलं संबंधित तरुणावर प्रेम आहे, स्वतःच्या मर्जीने आपण त्याच्यासोबत गेलो होतो, असा जबाब तरुणीनं कोर्टात दिला होता. शिवाय तिने प्रतिज्ञापत्र दाखल करत आई आणि भावाने दाखल केलेली फिर्याद पूर्णपणे खोटी असल्याचं सांगितलं होतं.

त्यानंतर पीडित तरुणीला सुधारगृहात पाठवण्यात आलं. सुरक्षेच्या कारणास्तव तिची रवानगी सुधारगृहात केल्याची माहिती पोलिसांनी दिली होती. त्यानंतर या प्रकरणात मोठा ट्विस्ट आला. बारामती पोलीस ठाण्यात आणि कोर्टात मुलासोबत राहायचं असल्याच्या भूमिकेवर ठाम असलेल्या मुलीनं नंतर तिचा जबाब बदलला. भिगवण प्रकरणातील मुलीनं आईकडे जाण्याची इच्छा व्यक्त केली.

भिगवण प्रकरणातील मुलगी जहीर शेख या तरुणासोबत 17 फेब्रुवारी रोजी निघून गेल्यानं मोठा वाद निर्माण झाला होता. भिगवणमधून निघून गेल्यानंतर बारामती पोलीस स्टेशनला 20 फेब्रुवारीला तरुणासह हजर झाली होती.

भिगवण अपहरणात प्रकरणातील तरुणीने इंदापूर अतिरिक्त सत्र न्यायालयासमोर आपल्याला आईकडे आणि मामाकडे जायची इच्छा व्यक्त केली. 20 फेब्रुवारी रोजी बारामती सत्र न्यायालयासमोर या तरुणीने आपण आईसोबत जाणार नसून जहीर शेख सोबतच जाणार असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर नंतर इंदापूर अतिरिक्त सत्र न्यायालयात व्हीसीद्वारे या प्रकरणातील सुनावणी पार पडली. इंदापूर अतिरिक्त सत्र न्यायालयाने संबंधित तरुणीला व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे  काही प्रश्न विचारले. यावेळी संबंधित तरुणींना आई आणि मामा सोबत जाण्याची इच्छा व्यक्त केली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles