Sunday, November 2, 2025

काश्मीर प्रश्नी डोनाल्ड ट्रम्प यांचा हस्तक्षेप ते त्यांच्या गावचे पाटील आणि आम्ही आमच्या; त्यांना कोणी अधिकार दिला?

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले होते. त्यानंतर पाकिस्तानने सीमेलगतच्या भारतीय शहरांवर हल्ले करण्याचे प्रयत्न केले होते. याला भारतीय लष्कराने चोख प्रत्युत्तर देत हे हल्ले परतावून लावले होते.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव आखणी वाढले असे दिसत असताना अमेरेिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून भारत आणि पाकिस्तान शस्त्रविरामास तयार झाले असल्याची घोषणा केली होती. इतकेच नव्हे तर, त्यानंतर त्यांनी भारत आणि पाकिस्तानमधील काश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचं म्हटलं होतं.

दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांच्या काश्मीर प्रश्नावरील वक्तव्यावर शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना यामध्ये पडण्याचा अधिकार कोणी दिला? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. याचबरोबर, “ट्रम्प त्यांच्या गावचे पाटील आहेत व आम्ही आमच्या गावचे”, असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.

ट्रम्पना सरपंच म्हणून नेमलेले नाही

आज पत्रकारांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले की, “आपण पाकिस्तानसमोर झुकलेलो नाही तर अमेरिकेसमोर झुकलो आहोत. डोनाल्ड ट्रम्प यांना आपण सरपंच म्हणून नेमलेले नाही. त्यांना फौजदारकी करायचा अधिकार पंतप्रधान मोदींनी कसा काय दिला. ट्रम्प रोज भारत, पाकिस्तान आणि काश्मीर विषयी सूचना करत आहेत. त्यांनी आधी शस्त्रविराम केला आपण ऐकले, ते आता म्हणत आहेत मी आता काश्मीर प्रश्न सोडवतो.”“जर आम्ही आमचं लष्कर समर्थ आहे असे म्हणत आहे, तर त्यामध्ये ट्रम्प यांनी लक्ष घालण्याची गरज नाही. किंवा सरपंच म्हणून जबाबदारी स्वीकारण्याची गरज नाही. ते त्यांच्या गावचे पाटील आणि आम्ही आमच्या गावचे पाटील. पण, नरेंद्र मोदी यांच्या सरकारने जी बोटचेपी भूमिका घेतली आहे त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यामध्ये घुसले आहेत.”

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles