Tuesday, November 4, 2025

नवनीत राणा यांना पाकिस्तानातून धमकी , नवनीत राणा म्हणाल्या…

भाजप आणि पाकिस्तानदरम्यान तणाव कायम आहे. युद्धविरामानंतर दोन्ही देशातील वरिष्ठांमध्ये चर्चा सुरु आहे. पाकिस्तानच्या हल्ल्यानंतर भारताने दिलेल्या प्रत्युत्तरात १०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा झाला. तर त्यांचे ३५ सैनिक मारले गेले. दोन्ही देशातील तणावादरम्यान माजी खासदार नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. नवनीत राणा यांना फोनवरून धमकी मिळाली आहे. ‘हिंदू वाघीण…तू काही दिवसांची पाहुणी आहे. तुला लवकरच संपवू. आता सिंदूर आणि सिंदूर लावणारी देखील वाचणार नाही, अशी धमकी देण्यात आली आहे. माजी खासदाराला वेगवेगळ्या क्रमाकांवरून धमकी मिळाली आहे.

पाकिस्तानातून फोन आल्यानंतर नवनीत राणा यांनी खार पोलिसांत माहिती दिली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. नवनीत राणा यांना याआधी देखील धमक्या मिळाल्या आहेत. नवनीत राणा यांनी ऑपरेशन सिंदूरनंतर आक्रमक विधाने केली होती.

नवनीत राणा यांनी म्हटलं होतं की, ‘त्यांनी घरात घुसून मारलं, आता त्यांचासाठी स्मशानात खड्डा खोदला आहे. देशाच्या गादीवर तुमचा बाप बसला आहे’. सोशल मीडियावरूनही त्यांनी पाकिस्तानच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. ‘सिंदूरचा बदला सिंदूरने घेऊ. जय हिंद, जय भारत, अशी पोस्ट त्यांनी लिहिली होती.

नवनीत राणा २०१९ साली महाराष्ट्रातील अमरावती लोकसभा मतदारसंघातून अपक्ष निवडून आल्या होत्या. मात्र, २०२४ साली राणा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांचा पराभव झाला. काँग्रेसच्या बळवंत वानखेडे यांनी लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांना धूळ चारली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles