रोहित पवारांना धक्का कर्जत नगरपंचायत राष्ट्रवादी काँग्रेस गटाचा गट नेता बदलण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांनी पुन्हा फेटाळली
अहिल्यानगर १२ कर्जत नगरपंचायतीमधील रोहित पवार गटाच्या कर्जत नगरपंचायत राष्ट्रवादी काँग्रेस गटनेता बदलण्याची मागणी रोहित पवार गटांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केलेली होती व त्यामध्ये अमृत काळ दाते यांना गटनेता म्हणून नोंदविण्यात बाबत विनंती करण्यात आली होती जिल्हाधिकारी यांचे समोर झालेल्या सुनावणीअंती गटनेता बदलाबाबत रोहित पवार गटाची असणारी मागणी जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळून लावून कर्जत नगरपंचायत राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे गटनेते म्हणून संतोष मेहत्रे व उपनेते म्हणून सतीश पाटील यांची असणारे नेमणूक कायम ठेवलेली होती सदरील जिल्हाधिकारी यांच्या आदेशाविरुद्ध अमृत काळदाते यांनी माननीय उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ येथे याचिका दाखल केलेली होती सदरील याचिकेच्या सुनावणी दरम्यान पुन्हा याप्रकरणी निर्णय घेण्याबाबत जिल्हाधिकारी यांना आदेशित करण्यात आलेले होते त्याप्रमाणे जिल्हाधिकारी यांचेकडे सदरील अर्जावर सुनावणी घेण्यात आली सुनावणीअंती सदरील अर्जदार अमृत काळदाते यांनी दाखवलेली सभा झाली नसल्याची बाब अकरा नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या समक्ष निदर्शनास आणून दिली त्याचबरोबर अशा स्वरूपाची सभा झालेली नसेल तर जिल्हाधिकारी यांना सदरील प्रकरणी सुनावणी घेण्याचा अधिकार असल्याची बाब व लोकशाही प्रक्रियेप्रमाणे बहुमताने गटनेता ठरवण्याचा नगरसेवकांना कायदेशीर अधिकार असल्याची बाब वकिलांनी माननीय जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिली त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी फेर सुनावणीत गटनेता बदलाचा अर्ज फेटाळून लावण्याचे आदेश पारित केलेले आहेत जिल्हाधिकारी यांच्या आदेशामुळे रोहित पवार गटाची कर्जत नगर नगरपंचायतीमधून अध्यक्षपदाची जशी सत्ता गेली तशीच उपाध्यक्ष पदाची देखील सत्ता जाणार असल्याची बाब निश्चित झालेली असून रोहित पवार यांना कर्जत मध्ये सदरचा मोठा धक्का मानला जात आहे त्यामुळे संतोष मेहत्रे यांना गटनेते कर्जत नगरपंचायती राष्ट्रवादी काँग्रेस गटाच्या सर्व सदस्यांना वीप बजावता येणार असून जे नगरसेवक सदस्य कर्जत नगरपंचायतीच्या रिक्त असणाऱ्या उपअध्यक्षपदाच्या होणाऱ्या निवडणुकीमध्ये व्हिप विरोधात मतदान करतील त्यांच्यावर आपात्रतेची टांगती तलवार राहणार आहे सदरील गटातील 11 नगरसेवकांच्या वतीने एडवोकेट गोरक्ष पालवे यांनी युक्तिवाद केला त्यांना एडवोकेट गुरविंदर पंजाबी सागर गरजे रोहित बुधवंत राहुल दहिफळे विशाल वांढेकर धनश्री खेतमाळीस रोहित चांडवले विवेक बडे पुष्कर बिडवाई अपेक्षा बोरुडे प्रवीण निंबाळकर बाळकृष्ण गीते यांनी सहाय्य केले


