राघव चढ्ढा यांनी ‘आप’वर झाडू फिरवला…भाजपत प्रवेश… हरभजन सिंगही सोबत

आम आदमी पार्टीचे राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांनी ‘आप’ सोडण्याचा निर्णय जाहीर केला आहे. दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की, ते पक्षाच्या दोन-तृतीयांश खासदारांसह भाजपमध्ये सामील होत आहेत. संदीप पाठक आणि अशोक मित्तल यांच्यासोबत आयोजित पत्रकार परिषदेत ‘आप’चे खासदार राघव चड्ढा म्हणाले, “आम्ही, राज्यसभेतील ‘आप’चे दोन-तृतीयांश सदस्य, भारतीय संविधानातील तरतुदींचा वापर करून भाजपमध्ये विलीन होण्याचा निर्णय घेतला आहे.” ते म्हणाले, “ज्या ‘आप’ला मी माझ्या रक्ताने आणि घामाने वाढवले ​​आणि माझ्या तारुण्याची 15 वर्षे समर्पित केली, तो पक्ष आता आपली तत्त्वे, मूल्ये आणि मूळ नैतिकतेपासून भरकटला आहे. हा पक्ष आता देशाच्या हितासाठी नव्हे, तर वैयक्तिक फायद्यासाठी काम करतो. गेल्या काही वर्षांपासून मला जाणवत होते की मी चुकीच्या पक्षात योग्य व्यक्ती आहे. त्यामुळे, आज मी जाहीर करतो की मी ‘आप’पासून वेगळे होत आहे आणि जनतेच्या अधिक जवळ जात आहे.”

राघव चड्ढा म्हणाले, “राज्यसभेत ‘आप’चे 10 खासदार आहेत, त्यापैकी दोन-तृतीयांश, म्हणजेच सात, आमच्यासोबत आहेत. त्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.

राघव चड्ढा
संदीप पाठक
राजेंद्र गुप्ता
विक्रम साहनी
स्वाती मालीवाल
हरभजन सिंग
अशोक मित्तल

राघव चढ्म्हढा णाले, “अजूनही बरेच जण सामील होतील. भाजपमध्ये सामील होण्याची प्रक्रिया आज संध्याकाळी होईल. भारताच्या संविधानात अशी तरतूद आहे की, जर दोन-तृतीयांशपेक्षा जास्त खासदारांना दुसऱ्या पक्षात सामील व्हायचे असेल, तर ते तसे करू शकतात. हा अधिकार आम्हाला भारताच्या संविधानानेच दिला आहे.गेल्या काही वर्षांपासून मला असे वाटत होते की, मी चुकीच्या पक्षात योग्य व्यक्ती आहे. त्यामुळे, आज मी जाहीर करतो की, मी ‘आप’पासून दूर जात आहे आणि जनतेच्या अधिक जवळ येत आहे.” राघव चड्ढा म्हणाले,

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles