शिक्षण अधिकाऱ्यांनी घेतली शिपाई कर्मचाऱ्यांची दखल.
इसळक निंबळक विद्यालयाच्या मुख्याध्यापकाच्या वेतनाला स्थगिती.
नगर (प्रतिनिधी)- इसळक निंबळक येथिल माध्यमिक विद्यालय या शाळेतील शिपाई कर्मचारी अरुण गेनु दळवी हे १९९२ पासून कार्यरत आहेत.२० फेब्रुवारी २०२५ रोजी शाळेत काम करत असताना अचानक चक्कर आल्याने शाळेचे मुख्याध्यापक विनायक मुरलीधर मगर यांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. २० फेब्रुवारी २०२५ ते १७ मार्च २०२५ पर्यंत अरुण दळवी हे आजारी रजेवर होते.
१७ मार्च २०२५ रोजी शाळेत दैनंदिन कामासाठी हजर झाले असता संस्थेचे अध्यक्ष नितीन भाऊसाहेब कोतकर व मुख्याध्यापक विनायक मुरलीधर मगर तसेच तत्कालीन मुख्याध्यापक बाबासाहेब कारभारी रहाटळ यानी जाणीवपूर्वक त्रास देण्याच्या उद्देशाने शिपाई अरुण गेणू दळवी यांना दैनिक हजेरी मस्टरवर स्वाक्षरी करून देण्यास विरोध केला होता. परंतु मा. शिक्षणाधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार केली असता मुख्याध्यापक यांना दि. २७ मार्च २०२५ रोजीच्या आदेशाप्रमाणे तात्काळ हजर करून स्वाक्षरी करून देण्यास आदेशित केले होते.परंतु मुख्याध्यापक व संस्था अध्यक्ष यांनी शिक्षणाधिकारी यांच्या आदेशाला न जुमानता केराची टोपळी दाखवून शिपाई अरुण दळवी यांना स्वाक्षरी करण्यास विरोध केला होता. त्यामुळे शिपाई दळवी यांनी शिक्षणाधिकारी यांना पुन्हा भेटून पत्र दिले व शिक्षण अधिकारी यांनी दि.२२ एप्रिल २०२५ रोजी मुख्याध्यापक यांना स्मरण पत्र देऊन आदेशित केले होते. की आज रोजी अरुण दळवी यांना दि. १७ मार्च २०२५ पासून हजर करून घेण्यात यावे व दैनिक हजेरी रजिस्टरवर स्वाक्षरी करण्यास विरोध करू नये. असे आदेशित केले होते परंतु शिक्षणाधिकारी यांचे दोन्ही आदेशाचा अवमान केल्याने मा. शिक्षणाधिकारी यांनी दि. २ मे २०२५ रोजीच्या आदेशाने मुख्याध्यापक विनायक मुरलीधर मगर यांचे वेतन तात्काळ बंद करण्याचे लेखी आदेश पत्र देण्यात आलेले आहे. व अरुण गेणू दळवी यांच्या वैद्यकीय बिलाच्या फाईल दि. ४ ऑक्टोंबर २०२४ रोजी मा. शिक्षणाधिकारी यांच्याकडून मंजूर होऊनही अद्याप पर्यंत जाणीवपूर्वक मुख्याध्यापक व संस्था अध्यक्ष यांनी मंजुरीसाठी पाठवलेल्या नसल्याने शिक्षणाधिकारी यांनी मुख्याध्यापक यांच्या वेतनातून कपात करून अरुण दळवी यांचे वैद्यकीय बिल अदा करण्याचे लेखी आदेश केलेले आहेत. माध्यमिक विद्यालय इसळक निंबळक या विद्यालयामध्ये संस्थेकडून कर्मचाऱ्यांना विनाकारण त्रास देण्याचा प्रकार वारंवार होत असुन शिक्षणाधिकारी अशोक कडूस साहेब यांनी घेतलेला कर्मचारी यांच्या बाबतचा निर्णयाचे योग्य असल्याने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकडून स्वागत होत आहे. तसेच भविष्यात जुलमी व मनमानी करणाऱ्या संस्था हे कर्मचारी यांच्यावर कुठल्याही प्रकारचे विनाकारण बंधन घालणार नाही व त्रास देणार नाही या आदेशाने कर्मचारी व शिक्षक हे संस्थाचालकांच्या त्रासातून नक्कीच मोकळा श्वास घेतील अशी अपेक्षा सर्व कर्मचारी अरुण गेनू दळवी यांच्याकडून केली आहे.
नगर जिल्हा परिषद शिक्षण अधिकाऱ्यांनी घेतली शिपाई कर्मचाऱ्यांची दखल , मुख्याध्यापकाच्या वेतनाला स्थगिती
- Advertisement -


