झाडावरून पडलेला आंबा उचलाल तर 3.74 लाखांचा दंड, सरकारचा नियम Video

हा व्हिडीओ ppriyankasinha या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ एका भारतीय महिलेनं शूट केला आहे. तिनं सर्वात आधी एक आंब्याचं झाड दाखवलं. या झाडावर भरपूर आंबे आहेत. काही आंबे तर रस्त्याच्या कडेला अक्षरशः सडत आहेत. पण या आंब्यांना स्पर्श करण्याचा अधिकार लोकांना नाही. महिला सांगते की, हे झाड सरकारी आहे आणि इथल्या नियमांप्रमाणे सरकारी झाडावरील फळं किंवा फुलं तोडण्यास सक्त मनाई आहे. जर तुम्ही खाली पडलेला आंबा उचलला, तर तुम्हाला ५ हजार सिंगापूर डॉलर्स म्हणजे भारतीय चलनात जवळपास ३.५ लाख रुपयांचा दंड बसू शकतो.

सिंगापूरमध्ये एक अनोखा नियम आहे. जर तुम्ही सरकारी झाडाखाली पडलेला आंबा जरी उचललात, तरी तुम्हाला ३.५ लाख रुपयांचा दंड बसू शकतो. हा अनुभव एका भारतीय महिलेनं सांगितला आहे.

व्हिडीओ ८ लाख ११ हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. तसंच अनेकांनी या व्हिडीओवर आश्चर्य व्यक्त केलं आहे. कारण भारतामध्ये अशा नियमांचा विचारसुद्धा करणे कठीण आहे. लोकं अनधिकृत घरं बांधून वर्षानुवर्षं राहतात. त्यापुढे झाडावरील आंबे तोडणं ही खूपच शुल्लक गोष्ट आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles