खासदार नीलेश लंके यांना रुग्णालयातून डिस्चार्ज ; लंके म्हणाले…

खा. नीलेश लंके यांना डिस्चार्ज

मायबाप जनतेचे आशीर्वाद माझ्या पाठीशी

खा. लंके भावुक

अहिल्यानगर : प्रतिनिधी

खासदार नीलेश लंके यांना गेल्या आठवड्यात विषाणूजन्य ताप व डिहायड्रेशनचा त्रास झाल्याने पुण्यातील रूबी हॉल क्लिनिक येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू असताना त्यांच्या प्रकृतीत झपाट्याने सुधारणा झाली असून बुधवारी सायंकाळी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

उपचारादरम्यान रूबी हॉल क्लिनिकच्या वैद्यकीय पथकाने सातत्याने त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवले. विविध वैद्यकीय तपासण्यांचे अहवाल सामान्य आल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना डिस्चार्ज देण्याचा निर्णय घेतला. डॉक्टरांनी काही दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला दिला असला तरी खासदार लंके यांनी गुरुवारपासून पुन्हा जनतेच्या सेवेत सक्रिय होणार असल्याचे सांगितले आहे.

मंगळवारी सोशल मीडियावरून नागरिकांशी संवाद साधताना खासदार लंके म्हणाले की, “जनता हाच माझा ऑक्सिजन आहे. मायबाप जनतेचे आशीर्वाद माझ्या पाठीशी असताना मी पुन्हा जनतेच्या सेवेत रुजू होणार आहे. माझ्या प्रकृतीची चिंता करणाऱ्या सर्व नागरिकांचे, कार्यकर्त्यांचे आणि हितचिंतकांचे मी मनःपूर्वक आभार मानतो.”

उपचारादरम्यान विविध राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी रूबी हॉल क्लिनिक येथे भेट देऊन खासदार लंके यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. तसेच राज्यभरातून कार्यकर्ते व नागरिकांनी त्यांच्या लवकर प्रकृती सुधारण्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.

रुग्णालयातून डिस्चार्ज घेताना खासदार लंके यांनी त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर, परिचारिका तसेच वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे आभार मानत उपचारादरम्यान घेतलेल्या काळजीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles