भोंदू खरात आणि रुपाली चाकणकरांचा गुवाहाटी दौरा; एकाच हॉटेलमध्ये मुक्काम; हॉटेल डिटेल्स समोर

अशोक खरात याचे उद्योग समोर आल्यानंतर आपला काहीही संबंध नाही, असे दाखविणाऱ्या महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर चांगल्याच अडकल्या आहेत. महाराष्ट्रातील सत्तांतरावेळी जे गुवाहाटी चर्चेत आले, त्याच गुवाहाटीला अशोक खरात याच्यासोबत रुपाली चाकणकर यांनी दौरा केला. विशेष म्हणजे रुपाली चाकणकर यांच्या भगिनी प्रतिभा चाकणकर या देखील त्यांच्या दौऱ्यात सहभागी होत्या. गुवाहाटीच्या हॉटेल ब्लू रॅडिसन येथे तिघांनीही तीन दिवस मुक्काम केला. अधोरेखित करण्यासारखी बाब म्हणजे खरात प्रकरणातच आर्थिक अफरातफरीचा आरोप ठेवून चाकणकर यांना ईडीने उद्या (गुरूवारी) चौकशीसाठी बोलावले आहे. त्याआधी त्यांचा खरातसोबत गुवाहाटी दौरा समोर आल्याने चाकणकर चहूबाजूंनी अडकल्याचे बोलले जाते.अशोक खरात याच्या नाशिकच्या मिरगावातील काळ्या कृत्यांनी संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला. श्रीमंत भक्तांना भुलवून त्यांच्याकडून लाखो रूपये उकळून, शेकडो महिलांचे लैंगिक शोषण करण्याचा कारनामे त्याने केले. त्याच्याच कार्यालयात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने हा संपूर्ण प्रकार उघडकीस आणला. याच प्रकरणात खरात सोबत असलेल्या जवळीकतेमुळे चाकणकर यांना राजीनामा द्यावा लागला. खरातसोबत आपले थेट संबंध नव्हते, त्यांना केवळ आध्यामिक गुरू मानत होते, असे सांगून रुपाली चाकणकर यांनी हात झटकण्याचा प्रयत्न केला. परंतु खरात याची दीड महिना चौकशी करून एसआयटीने चाकणकर यांनाही चौकशीसाठी पाचारण केल्याने त्यांच्यासाठी हा मोठा धक्का होता. आता खरातसोबतच्या गुवाहाटी दौऱ्याने त्यांचा पाय अधिक खोलात गेला आहे.

भोंदू खरात आणि रुपाली चाकणकर हे एकत्र गुवाहाटीला गेल्याचे समोर आले आहे. रुपाली चाकणकर यांच्या भगिनी प्रतिभा चाकणकर या देखील त्यांच्यासोबत होत्या. या सर्वांनी गुवाहाटीच्या हॉटेल ब्लू रॅडिसन येथे तिघांनीही तीन दिवस मुक्काम केला असल्याचीही माहिती समोर आली आहे. 28 ॲागस्ट 2021 ते 30 ॲागस्ट 2021 हे तीन दिवस तिघेही रेडीसन ब्लू या हॅाटेलमध्ये वास्तव्यास होते. या काळात त्यांनी कामाख्या देवीचे दर्शन घेऊन पूजा अर्जा केल्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण गुवाहाटीतील मंदिर नऊ ग्रहांच्या पूजेसाठी प्रसिद्ध आहे. ब्रह्मपुत्रा नदीच्या मध्यभागी असलेल्या बेटावर शिवाचे मंदिर आहे. येथे विशेष पूजा अर्चा केल्या जात असल्याची माहिती समोर आली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles