संतांची भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहरात हॉटेलमधील कर्मचारी महिलेचे अंघोळ करताना फोटो काढले, धमकी देऊन मालकाने केला अत्याचार

बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव शहरात एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला असून, एका हॉटेल मालकानेच आपल्या महिला कर्मचाऱ्याचे लैंगिक शोषण केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शेगाव शहरातील खामगाव मार्गावरील एका नामांकित हॉटेलमध्ये अनेक महिला कर्मचारी कार्यरत आहेत. याच हॉटेलमध्ये काम करणाऱ्या एका महिलेवर हॉटेल मालक ज्ञानेश्वर लिप्ते याने अत्याचार केल्याचा आरोप आहे. संबंधित महिलेचे अंघोळ करतानाचे फोटो आणि व्हिडिओ चोरून काढून, ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीने तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

इतकेच नव्हे, तर पीडित महिलेला जातीवाचक शिवीगाळ करून मानसिक छळही करण्यात आल्याचे समोर आले आहे. भीतीमुळे काही काळ महिलेने या बाबत कोणालाही सांगितले नाही. मात्र, अखेर धाडस करून पीडित महिलेने शेगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रार मिळताच पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी ज्ञानेश्वर लिप्ते याच्याविरुद्ध लैंगिक अत्याचार, विनयभंग तसेच अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, त्याची सखोल चौकशी सुरू आहे. या घटनेमुळे शेगाव शहरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, अशा प्रकारच्या गुन्ह्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles