नीट फेरपरीक्षेबाबत महत्वाची अपडेट ; नीट फेरपरीक्षेची तारीख जाहीर

नीट फेरपरीक्षेबाबत महत्वाची अपडेट समोर आलीये

नीट फेरपरीक्षेची तारीख नॅशनल टेस्टिंग एजन्सीने जाहीर केली

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने विद्यार्थ्यांना महत्वाच्या सूचना देखील दिल्या

पेपरफुटीमुळे रद्द करण्यात आलेली ‘NEET’ फेरपरीक्षा आता २१ जून २०२६ रोजी होणार आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) यासंदर्भात अधिकृत माहिती प्रसिद्ध केली आहे. यापूर्वी ३ मे २०२६ रोजी नीटची परीक्षा पार पडली होती; मात्र पेपरफुटीचे प्रकरण समोर आल्यानंतर सरकारने ही परीक्षा रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतला होता. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन देशभरात सीबीआयकडून (CBI) धडक कारवाई करण्यात आली होती. यामध्ये नाशिक, पुणे, हरियाणा आणि दिल्लीसह देशभरातील पेपरफुटीचे मोठे जाळे उघडकीस आले होते. अखेर सर्व कायदेशीर प्रक्रिया आणि तपासानंतर, सरकारने आता नीट परीक्षेची नवीन तारीख नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) भारत सरकारच्या मान्यतेने NEET (UG) २०२६ च्या परीक्षेबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, आता ही फेरपरीक्षा रविवार, २१ जून २०२६ रोजी आयोजित केली जाणार आहे. परीक्षेच्या पारदर्शकतेसाठी आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

परीक्षेच्या संदर्भात कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता, परीक्षार्थी आणि पालकांनी केवळ NTA च्या अधिकृत संकेतस्थळावर आणि माध्यमांवरच अवलंबून राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहिती किंवा शंकांसाठी उमेदवार neet-ug@nta.ac.in या ईमेलवर संपर्क साधू शकतात किंवा ०११-४०७५९००० / ०११-६९२२७७०० या हेल्पलाइन क्रमांकावर कॉल करू शकतात.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles