नगर (सचिन कलमदाणे): सरकारने संजय गांधी निराधार योजना, राजीव गांधी योजना, अपंग योजनांसह अन्य वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी हयातीचे दाखले प्रक्रिया ऑनलाइन केली आहे. विहित पद्धतीने हयातीचे दाखले मिळवणे बंधनकारक करण्यात आले आहे. असे असले तरी दाखले मिळवण्यासाठी पात्र लाभार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. विशेषतः वयोवृद्ध व्यक्ती, दिव्यांगांना दाखले मिळवताना भटकंती करावी लागते. नगरच्या नालेगाव येथील टांगे गल्ली येथील वनिता कॉम्प्युटर येथे संबंधित दाखले मिळण्याची सुविधा उपलब्ध आहे.
याठिकाणी येणाऱ्या लाभार्थ्यांना चांगली सेवा मिळण्यासाठी मनोज भुजबळ विशेष परिश्रम घेताना दिसतात. नुकतीच एक दिव्यांग महिला हयातीच्या दाखल्यासाठी याठिकाणी आली होती. रिक्षात आलेल्या या महिलेला रिक्षातून उतरून कार्यालयात जाणे जिकिरीचे होते. ही अडचण ओळखून भुजबळ यांनी संवेदनशीलता दाखवली. त्यांनी स्वतः कार्यालया बाहेर येत महिलेला रिक्षातच थांबवून तिची ठसे घेण्याची ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण केली. या मदतीमुळे संबंधित दिव्यांग महिला खूप आनंदित झाली. भुजबळ यांना धन्यवाद देताना तिच्या चेहऱ्यावर कृतज्ञता व्यक्त होत होती.
मनोज भुजबळ यांच्या या संवेदनशील कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे. भुजबळ अनेक वर्षांपासून ऑनलाईन दाखले काढून देणे, आयुष्यमान भारत कार्ड काढून देणे, शासकीय योजनांचे अर्ज भरणे, ई केवायसी प्रक्रिया करणे अशी कामे करतात. नाममात्र शुल्क आकारून ते ही सेवा देत असून कोणाचीही अडवणूक होणार नाही आणि जलद सेवा देण्यासाठी ते प्रयत्नशील असतात.
संपर्क :- मनोज भुजबळ – मो. 9049948555 वनिता कॉम्प्युटर्स, सुनंदन बिल्डिंग, तांगेगल्ली, जुन्या कोर्टाजवळ, अहिल्यानगर


