Nashik कुंभमेळयाच्या बोधचिन्हावरून वाद….वैष्णव परंपरेला डावलले

मुंबईत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले. यात केवळ शैव परंपरेलाच स्थान देण्यात आले असून वैष्णव परंपरेला डावलण्यात आल्याचा आक्षेप श्री काळाराम मंदिराचे पुजारी महंत सुधीरदास महाराज यांनी घेतला आहे. प्रभू श्रीरामाचे धनुष्यबाण व गरुडाचा समावेश करावा, अन्यथा वैष्णव पंथीयांना मोठा विचार करावा लागेल, असा इशारा त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे.

नाशिकचे श्री काळाराम मंदिर, पवित्र गोदावरी नदी, प्रभू श्रीरामाचे धनुष्यबाण, भगवान गरुड यांसह अमृतकुंभातून पडणारे अमृताचे थेंब या वैष्णव परंपरेचा आणि प्रतीकांचा या बोधचिन्हात समावेश नाही, तो करण्यात यावा अशी मागणी सुधीरदास यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली आहे.

नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा हा महाराष्ट्रासाठी सेवेचा आदर्श निर्माण करण्याची संधी आहे. आखाड्यांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध होण्यासाठी प्रति आखाडा पाच कोटींचा निधी, छोट्या संस्थानसाठी प्रति संस्थान १५ लाख रुपये, आखाड्यांच्या वीज देयकाची प्राधिकरणाच्या माध्यमातून अदायगी, आखाड्याची जमीन शासकीय कामासाठी अधिग्रहित केल्यास आखाड्यांना मोबदला किंवा जमीन देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली.

कुंभमेळ्यासाठी जगभरातून येणाऱ्या साधू, महंत व भाविक यांची सेवा करीत त्यांच्या मार्गदर्शनातून कुंभमेळ्याचे भव्य-दिव्य आयोजन करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित सिंहस्थ कुंभमेळा आढावा बैठकीत सांगितले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles