राज्याच्या पोलीस दलात खळबळ; 24 बड्या IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य प्रशासनाप्रमाणेच आता पोलीस दलातही मोठ्या प्रमाणात फेरबदल करण्याचा निर्णय घेतला असून शुक्रवारी त्यांनी गृह विभाग अंतर्गत पोलीस प्रशासनात मोठ्या प्रमाणात फेरबदल केले. मुख्यमंत्र्यांनी अप्पर पोलीस महासंचालक श्रेणीतील अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्यातचे आदेश दिले आहेत. त्यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. गृह विभागाने पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश निर्गमित केले असून त्यांना तातडीने बदलीच्या ठिकाणी रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

आज ज्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत त्यामध्ये अपर पोलीस महासंचालक श्रेणीतील पदावर पदोन्नती आणि बदली झालेल्या अधिकाऱ्यामध्ये कृष्ण प्रकाश- अपर पोलीस महासंचालक, फोर्स वन यांची अपर पोलीस महासंचालक (प्रशिक्षण) येथे, दत्ता कराळे-विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र, नाशिक यांची विशेष पोलीस महानिरीक्षक, राज्य मानवी हक्क आयोग येथे बदली करण्यात आली आहे.

विशेष पोलीस महानिरीक्षक, प्रशिक्षण प्रविण पडवळ यांची विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र येथे, लखमी गौतम(पोलीस सह आयुक्त (गुन्हे), बृहन्मुंबई) यांची विशेष पोलीस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था), मुंबई, मनोज शर्मा यांची पोलीस सह आयुक्त (कायदा व सुव्यवस्था), बृहन्मुंबई, सुवेझ हक यांची पोलीस सह आयुक्त (प्रशासन), महेश पाटील यांची विशेष पोलीस महानिरीक्षक, (नियोजन व समन्वय) येथे पदोन्नती ने बदली करण्यात आली आहे परमजीत दहिया यांची दहशतवाद विरोधी पथक (पदोन्नतीने) विशेष पोलीस महानिरीक्षकपदी, सी.के. मीना यांची विशेष पोलीस महानिरीक्षक, कोकण परिक्षेत्र,संजय दराडे यांची पोलीस सह आयुक्त, पुणे, रंजन शर्मा यांची विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र तर सुनिल फुलारी यांची विशेष पोलीस महानिरीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग (पूर्व),राजेश प्रधान यांची पोलीस सह आयुक्त, आर्थिक गुन्हे, निशिथ मिश्रा यांची विशेष पोलीस महानिरीक्षक, प्रशिक्षण, जय कुमार यांची विशेष पोलीस महानिरीक्षक, फोर्स वन,संजय येनपुरे यांची विशेष पोलीस महानिरीक्षक, व्ही.आय.पी. सुरक्षा, संजय जाधव यांचीअपर पोलीस आयुक्त, ठाणे, दिपक साकोरे यांची पोलीस सह आयुक्त, नवी मुंबई, पंजाबराव उगले यांची विशेष पोलीस महानिरीक्षक, पोलीस गृह निर्माण महामंडळ आणि एस. व्ही. पाठक यांची विशेष पोलीस महानिरीक्षक (आर्थिक गुन्हे), गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे येथे बदली करण्यात आली आहे.

तसेच विनायक देशमुख यांची नियंत्रक, वैधमापन,ज्योती प्रिया सिंग यांची विशेष पोलीस महानिरीक्षक, अंमली पदार्थ विरोधी पथक,अनिल कुंभारे यांची पोलीस सह आयुक्त (गुन्हे), मुंबई, सत्य नारायण चौधरी यांची पोलीस सह आयुक्त, वाहतूक, येथे नियुक्ती करण्यात आली आहे. आली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles