राज्यात कांद्याचे दर कोसळल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. आखाती देशातील युद्ध, निर्यात बंदी आणि निसर्गाच्या प्रकोपामुळे कांद्याचा खर्चही निघत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी आज प्रचंड आर्थिक संकटात सापडला आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने तातडीने कांद्याला किमान 2 ते 3 हजार हमीभाव द्यावा तसेच प्रति क्विंटल 1500 रुपये अनुदान द्यावे. नाफेडमार्फत कांदा खरेदी सुरू करावी. केंद्र सरकारशी समन्वय साधून दीर्घकालीन स्थिर निर्यात धोरण लागू करावेत, अशा अनेक मागण्या शेतकऱ्यांकडून केल्या जात आहे. तसेच विरोधकांनीही याच मुद्द्यावर बोट ठेवत सरकारवर टीका केली आहे. एकंदरीत या सर्व पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे
यावेळी बोलताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कि, केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह यांना विनंती केली आहे कि, आमचा कांद्याचा शेतकरी प्रचंड अडचणीत आहे, अनेक शेतकरी कांद्याला एक रुपये भाव मिळतो म्हणून कांदे फेकून द्यायला निघाले आहेत. म्हणून मी कृषीमंत्री शिवराज सिंह चौहानांना सांगितलं, काही झालं तरी कांदा विकत घ्या, कांद्याचं शेल्फ लाईफ जास्त नाही. त्याची खरेदी, साठवणूक करुन तो पुन्हा बाजारात आणायचा, हे सगळं अडचणीचं असतं. पण आपल्या विनंतीला मान देऊन आजपासून महाराष्ट्रात शिवराज सिंह चौहान आणि पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्त्वात 12 रुपये 35 पैशांनी कांद्याची खरेदी सुरु होत आहे. हा कांद्याच्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा ठरेल. अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यानी दिली आहे. सातारा येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णकृती पुतळ्याचे अनावरण कार्यक्रम सोहळ्यासाठी उपस्थिती लावली. यानंतर प्रधानमंत्री आवास योजनेच्या आणि घरकुल लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमातही ते उपस्थित होते. यावेळी त्यांनी हि घोषणा केली आहे.
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, कांदा खरेदीबाबत CM फडणवीसांची सर्वात मोठी घोषणा, दर जाहीर
- Advertisement -


