राजेंद्र शेडाळे यांच्या कडून बालघर प्रकल्प मधील बालकांसाठी धोंडे जेवण

राजेंद्रजी शेडाळे यांच्या कडून बालघर प्रकल्प मधील बालकांसाठी धोंडे जेवण कार्यक्रम संपन्न
अहिल्यानगर : रुद्रपूजा फाउंडेशन संचलित बालघर प्रकल्प, तपोवन रोड येथील अनाथ व निराधार बालकांसाठी धोंडे जेवण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम समाजसेवक तथा उद्योजक मा. श्री. राजेंद्र शेडाळे व सौ मंगलताई शेडाळे परिवाराने आयोजित केला होता.
आई-वडिलांच्या मायेपासून दूर असलेल्या बालकांना प्रेम, आपुलकी व कुटुंबाचा सहवास मिळावा या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात बालकांनी आनंदाने सहभाग घेतला. शेडाळे कुटुंबियांनी बालकांशी संवाद साधत त्यांना मायेची ऊब दिली.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी “अनाथ व निराधार बालकांची सेवा हीच खरी ईश्वरसेवा आहे,” असे सांगत समाजातील सक्षम व्यक्तींनी अशा उपक्रमांना सहकार्य करण्याचे आवाहन केले.
या प्रसंगी सोनवणे कुटुंबीय, शेडाळे परिवाराचे स्नेहीजन तसेच बालघर प्रकल्पाचे युवराज गुंड, सुधाकर शेडाळे, अमोल पुंड,आदिनाथ ढवळे , रुक्मिणी ठोंबरे,पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाबद्दल बालकांनी आनंद व्यक्त केला

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles