अहिल्यानगर पोलीस मुख्यालयात प्रशिक्षणादरम्यान हँडग्रेनेडचा स्फोट, 4 जवान जखमी

अहिल्यानगर पोलीस मुख्यालयात प्रशिक्षणादरम्यान हँडग्रेनेडचा स्फोट, 4 जवान जखमी

अहिल्यानगर, 23 मे 2026: येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर सुरू असलेल्या प्रशिक्षणादरम्यान अत्यंत धक्कादायक दुर्घटना घडली आहे. मॉक ड्रिल दरम्यान हाताळणीचे प्रशिक्षण दिले जात असताना एका हँडग्रेनेडचा हातातच भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत चार प्रशिक्षणार्थी पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत.

आज सकाळी 10 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. यामुळे पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस कर्मचाऱ्यांना हँडग्रेनेड कसा हाताळावा याबाबत प्रात्यक्षिकासह माहिती दिली जात होती. त्याचवेळी अचानक हँडग्रेनेडचा हातातच स्फोट झाला.

या दुर्दैवी घटनेत शिवराज पवार, शुभम कावरे, गणेश मढे आणि योगेश सोळुंके हे चार प्रशिक्षणार्थी पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. यापैकी दोघांच्या हाताच्या बोटांच्या चिंधड्या उडाल्या आहेत. तर इतर दोन कर्मचारी किरकोळ जखमी झाले आहेत.

घटनेनंतर संपूर्ण पोलीस मुख्यालयात एकच पळापळ आणि गोंधळ उडाला. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. सर्व जखमी कर्मचाऱ्यांना तातडीने जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

राखीव पोलीस निरीक्षक उमेश परदेशी यांनी सांगितले की, हा स्फोट स्मोक हँडग्रेनेड फुटल्यामुळे झाला आहे. जमाव पांगवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या या ग्रेनेडची पिन काढल्यानंतर संबंधित जवानांकडून लिव्हर सुटल्याने हा अपघाती स्फोट झाला. या घटनेमुळे पोलीस वर्तुळातून मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles