महाराष्ट्राच्या विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज संस्थांमधून निवडल्या जाणाऱ्या आमदारांच्या 17 जागांसाठी निवडणूक जाहीर झालेली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटचे दोन दिवस राहिलेले आहेत. राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अशातच महाराष्ट्राच्या राजकारणात पक्षांतराचे वारे वाहू लागले आहेत. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि माजी आमदार प्राजक्त तनपुरे हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. त्याचबरोबर माजी मंत्री राजेश टोपे हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. याबाबत राजेश टोपे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते राजेश टोपे हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. याबाबत खुद्द टोपे यांनीच प्रतिक्रिया दिली आहे. भाजप प्रवेशाच्या माझ्या बाबत येणाऱ्या बातम्या चुकीच्या आहेत. मी कुठेही जाणार नाही, अशी भूमिका राजेश टोपे यांनी मांडली आहे. जालन्यातील घनसावंगी मतदारसंघाचे प्रमुख नेते आणि राज्याचे माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे हे देखील भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मे 2026 मध्ये स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून ते भाजपाच्या तिकिटावर विधान परिषद लढवतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. टोपे यांनी यापूर्वी पक्ष सोडण्याचे वृत्त फेटाळले असले, तरी सध्याची बदललेली राजकीय परिस्थिती पाहता ते देखील भाजपचा मार्ग धरू शकतात, असे संकेत मिळत आहेत. एका बाजूला मराठा आरक्षणाचे आंदोलन सुरू असतानाच, राजेश टोपे यांचा संभाव्य भाजपा प्रवेश हा मराठवाड्यातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलणारा ठरू शकतो. मात्र राजेश टोपे यांनी भाजप प्रवेशाबाबत येणाऱ्या बातम्या या चुकीच्या सल्याचे म्हटलं आहे. मी कुठेही जाणार नसल्याची भूमिका त्यांनी मांडली आहे.


