Friday, February 20, 2026

अहिल्यानगर माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्यावर गुन्हा दाखल

अहिल्यानगर -माजी महापौर आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांच्यावर आर्थिक कारणावरुन डांबून ठेवून मारहाण केल्याचा गुन्हा दाखल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. रवींद्र रामराव शेळके यांच्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात मच्छिंद्र झेंडे, अभिषेक कळमकर, लालू उर्फ अभिषेक जगताप, तसेच एक महिलेसह अनोळखी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मागील आर्थिक कारणावरुन वेगवेगळ्या ठिकाणी डांबून ठेवून रवींद्र रामराव शेळके यांना मारहाण करून त्यांच्याकडून विविध स्टॅम्पवर बळजबरीने सह्या घेण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. रवींद्र रामराव शेळके हा माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्याकडे दहा वर्षापासून चालक म्हणून कामाला होते. मात्र कळमकर यांच्याशी आर्थिक कारणावरुन वाद झाल्याने रवींद्र शेळके याने दोन वर्षापासून चालक म्हणून असलेली नोकरी सोडून दिली होती. सहा महिन्यापूव सुद्धा रवींद्र रामराव शेळके यांच्या अंगाराव गाडी घालून मारण्याचा प्रयत्न झाला असल्याचा आरोप शेळके यांनी केला असून या प्रकरणी त्यांनी नगर तालुका पोलिस ठाण्यात तक्रार केली असल्याचे सांगितले.

12 मे रोजी रवींद्र रामराव शेळके यांचे नगर सोलापूर रोडवरून पांढऱ्या व रंगाच्या टोयाटो कंपनीच्या वाहनातून आलेल्या लोकांनी अपहरण करून त्यांना चिखली या ठिकाणी नेऊन मारहाण करण्यात आली. तसेच एका महिले बरोबर बळजबरीने फोटो काढून घेण्यात आले आणि त्यानंतर काही नोटरी आणि कागदपत्रांवर बळजबरीने सह्या घेतल्या असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्या पासून आपल्याला आणि कुटुंबाला धोका असल्याने शेळके यांनी केली संरक्षणाची मागणी केली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles