स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडून ११ नावांची यादी जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष नितीन नबीन आणि इतरही वरिष्ठ नेत्यांबरोबर चर्चा केल्यानंतर रविवारी रात्री भाजपने उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली. या यादीमध्ये काही नावांवर चांगलीच चर्चा सुरू झाली आहे. भाजपात इतर पक्षातून प्रवेश केलेल्या उमेदवारांना देखील संधी देण्यात आली आहे. एका उमेदवाराला पक्ष प्रवेशाच्या अवघ्या २४ वर्षात प्रवेश दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
विधान परिषदेच्या १७ जागांपैकी ११ जागांवर भाजप, ४ जागा शिवसेना शिंदे गटाला तर दोन जागा राष्ट्रवादी काँग्रेस लढणार आहे. महायुतीत जागावाटपावरून प्रचंड रस्सीखेच सुरू होती. भाजपने जाहीर केलेल्या यादीवरून कोणत्या जागा कोणत्या पक्षाकडे गेल्याचे आता स्पष्ट झाले आहे. राष्ट्रवादीकडून रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि पुणे विधान परिषदेची जागा लढवण्यात येणार आहे. या दोन्ही ठिकाणी तरुणांना संधी देण्या
भाजपने जाहीर केलेल्या यादीत नुकतेच पक्षात दाखल झालेल्या नेत्यांना संधी मिळाल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते, माजी आमदार राहिलेलेल प्राजक्त तनपुरे यांनी शनिवारी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांना रविवारी भाजपने थेट अहिल्यानगरमधून उमेदवारी जाहीर केली आहे.
त्याचप्रमाणे, सोलापूरमध्ये आधी शिवसेना आणि नंतर काँग्रेस असा राजकीय प्रवास केलेले माजी आमदार राजेंद्र राऊत यांनाही भाजपने उमेदवारी दिली आहे. विधानसभा निवडणुकीत फार कमी मतांच्या अंतराने राऊत यांचा ठाकरे गटाचे आमदार सोपल यांनी पराभव केला होता. तर दुसरीकडे, नांदेडमध्ये ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांचे अत्यंत निकटवर्तीय आणि काँग्रेसचे माजी आमदार अमर राजूरकर यांना भाजपकडून तिकीट मिळाले आहे. तर, धाराशिव-लातूर-बीड या अत्यंत महत्त्वाच्या जागेवर भाजपने काँग्रेसचे माजी आमदार बसवराज पाटील यांना रिंगणात उतरवले आहे.
काल प्रवेश आज उमेदवारी! इनकमिंग केलेल्या किती जणांना भाजपकडून उमेदवारी? पाहा यादी
- Advertisement -


