ढाकणे शैक्षणिक संकुल, शेवगाव येथे मेगा ओपन कॅम्पस ; ; २२८ विद्यार्थ्यांची विविध नामांकित उद्योगांमध्ये निवड

ढाकणे शैक्षणिक संकुल, शेवगाव येथे मेगा ओपन कॅम्पस ड्राइव्ह २०२६ ला अभूतपूर्व प्रतिसाद; २२८ विद्यार्थ्यांची विविध नामांकित उद्योगांमध्ये निवड

शेवगाव, दि. १ जून २०२६ : केदारेश्वर ग्रामीण विकास प्रतिष्ठान, संगमनेर संचलित ढाकणे शैक्षणिक संकुल, शेवगाव अंतर्गत समाजभूषण एकनाथराव ढाकणे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, डिप्लोमा इंजिनिअरिंग (पॉलिटेक्निक) महाविद्यालय, सुनिताताई एकनाथराव ढाकणे कॉलेज ऑफ मॅनेजमेंट तसेच समर्थ औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. एकनाथरावजी ढाकणे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या मेगा ओपन कॅम्पस ड्राइव्ह २०२६ ला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या भव्य रोजगार मेळाव्यात विविध नामांकित कंपन्यांनी सहभाग नोंदविला. कॅम्पस ड्राइव्हमध्ये ITI आणि इंजिनिअरिंग शाखेतील विद्यार्थ्यांची मुलाखत व निवड प्रक्रिया पार पडली. यामध्ये ITI विभागातील १११ व इंजिनिअरिंग विभागातील ११७ अशा एकूण २२८ विद्यार्थ्यांची निवड विविध नामांकित उद्योगांमध्ये करण्यात आली.

विद्यार्थ्यांची निवड Vision India Pvt. Ltd., Chromium Engineering Pune, R.S.B. Transmission Pune, Radhe Machinery Pvt. Ltd., Kalyani Tool Pvt. Ltd., Maydiya India Pvt. Ltd., L.T.H. IT Solutions Ahmednagar, John Deere आणि Pratishthan Pvt. Ltd., Paithan या प्रतिष्ठित कंपन्यांमध्ये झाली आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना वार्षिक २.१० लाख ते ३.२५ लाख रुपयांपर्यंतचे आकर्षक वेतन पॅकेज प्राप्त झाले आहे.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाच्या उद्योगांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या संस्थेच्या ध्येयाला या उपक्रमामुळे मोठे यश मिळाले आहे. विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. एकनाथरावजी ढाकणे साहेब, उपाध्यक्ष श्रीकांत ढाकणे, कोषाध्यक्ष हृषीकेश ढाकणे, संस्थेचे पदाधिकारी, प्राचार्य, विभागप्रमुख, प्राध्यापक व पालक यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

या मेगा ओपन कॅम्पस ड्राइव्हच्या यशस्वी आयोजनासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. महेश मरकड, प्रा. अंबादास डोंगरे, प्रा. रियाझखान अत्तार, प्रा. प्रवीण नागरगोजे, समर्थ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य संतोष आंधळे, निदेशक सुमित वायाळ तसेच निदेशक बोडखे यांनी विशेष परिश्रम घेतले. उद्योग क्षेत्राशी प्रभावी समन्वय साधून विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांच्या नियोजनबद्ध प्रयत्नांमुळे हा मेगा कॅम्पस ड्राइव्ह यशस्वी ठरला असून संस्थेच्या व्यवस्थापनाने त्यांच्या कार्याचे विशेष कौतुक केले आहे.

संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाबरोबरच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे कार्य सातत्याने सुरू असून, भविष्यातही अशा रोजगाराभिमुख उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles