एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे अमरावतीमधील दिग्गज नेते गोपीकिशन बाजोरिया आणि त्यांचा मुलगा विप्लव बाजोरिया यांच्यावर अमरावतीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विधान परिषद निवडणुकीच्या प्रक्रियेदरम्यान सरकारी कामात अडथळा आणल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. उमेदवारी अर्जाच्या छाननीवेळी बाजोरिया पिता-पुत्राने जिल्हाधिकारी कार्यालयात गोंधळ घातला होता. या प्रकरणी त्यांच्यावर हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
अमरावतीतून मोठी बातमी समोर आली आहे. महायुतीचे बंडखोर तथा अपक्ष उमेदवार माजी आमदार विप्लव बाजोरिया यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार हर्षजीत देशमुख यांनी आक्षेप घेतल्यानंतर बाजोरिया यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला आहे. महायुतीचे बंडखोर तथा अपक्ष उमेदवार माजी आमदार विप्लव बाजोरिया यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार हर्षजीत देशमुख यांनी विप्लव बाजोरिया यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतला होता. त्यानंतर त्यांचा अर्ज बाद करण्यात आला आहे. यानंतर बोलताना बायोरिया यांनी आमचा नामांकन अर्ज बाद व्हावा यासाठी चार उमेदवार एकत्र येऊन कटककारस्थान रचले असल्याचा आरोप करत या निर्णयाविरोधात आम्ही न्यायालयात जाणार आहे अशी माहिती दिली आहे.अमरावतीच्या जागेसाठी आता चौरंगी लढत पहायला मिळणार आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार हर्षजीत देशमुख, महायुतीचे उमेदवार प्रवीण पोटे पाटील, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निलेश विश्वकर्मा आणि प्रशांत महल्ले या चार उमेदवारांचे उमेदवारी अर्ज कायम आहेत. या चौघांमध्ये आता लढत पहायला मिळणार आहे.
निवडणूक अर्जांची छाननी आणि आक्षेपांवरील सुनावणीदरम्यान विप्लव बाजोरिया यांनी निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्याशी असभ्य वर्तन केले. बाजोरिया यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी बोलताना त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला, तसेच त्यांना धमकीवजा शिवीगाळ केल्याचाही आरोप आहे. या संदर्भात निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे यांनी गाडगेनगर पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल केली. त्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी बाजोरिया यांच्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे.


