आयकॉनिक रोबोटिक्स इन्स्टिट्यूट व विकास कोटकर यांचा मोठा पुढाकार.
ठळक मुद्दे • लाभार्थी: महाराष्ट्रातील 2 लाख विद्यार्थी • विषय: रोबोटिक्स, AI, इलेक्ट्रॉनिक्स, नवोपक्रम • स्वरूप: मोफत, प्रत्यक्ष कृतीवर आधारित प्रशिक्षण • उद्दिष्ट: रोबोट डिझाईन, सेन्सर्स, प्रोग्रामिंग, AI चे दैनंदिन उपयोग शिकवणे •
केंद्र सरकारच्या STEM (Science, Technology, Engineering and Mathematics) उपक्रमांतर्गत महाराष्ट्रातील तब्बल दोन लाख विद्यार्थ्यांना मोफत रोबोटिक्स, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), इलेक्ट्रॉनिक्स आणि नवोपक्रमाचे प्रशिक्षण देण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेण्यात आला आहे. आयकॉनिक रोबोटिक्स इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात येणार असून त्याचे नेतृत्व विकास कोटकर करीत आहेत.
फायदा: वैज्ञानिक दृष्टिकोन, सर्जनशीलता, समस्या सोडवण्याची क्षमता, ग्रामीण-शहरी तांत्रिक दरी कमी करणे
विकास कोटकर यांचे मत
“भविष्यातील तंत्रज्ञानाच्या जगासाठी विद्यार्थ्यांना सक्षम करणे, संशोधनाची आवड निर्माण करणे आणि नवकल्पनांना प्रोत्साहन देणे हा मुख्य उद्देश आहे. प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत आधुनिक तंत्रज्ञान पोहोचावे यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”
आवाहन: जास्तीत जास्त शाळा व विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे.
STEM आधारित हे प्रशिक्षण राज्यातील विद्यार्थ्यांसाठी तंत्रज्ञानाच्या नव्या युगाची दारे खुली करणारे ठरणार असल्याची भावना शिक्षण क्षेत्रातून व्यक्त होत आहे.


