कोकणात जेवढे काही एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे नेते आहेत, ते सर्व सुनील तटकरे यांच्याविरोधात होते, हे सर्व आपल्याला माहीत आहे. परंतु आता तडजोड झाली आहे. पूर्वी हे सर्व नेते काय म्हणायचे तर सुनील तटकरे आसेच आहेत तसेच आहेत, ते आपल्या पक्षाला अडचण करतात. परंतु मला वाटतं आता पालकमंत्रिपदाची तडजोड त्या ठिकाणी झाली असावी, असा गौप्यस्फोट आमदार रोहित पवार यांनी यावेळी केला आहे. परंतु मला असं वाटतं की ते जर सुनील तटकरे यांच्यावर विश्वास ठेवत असतील तर ते एक वेगळ्याच स्वप्नात आहेत, असा टोलाही यावेळी रोहित पवार यांनी लगावला आहे.
दरम्यान सुनील तटकरे यांनी असं म्हटलं आहे की, रोहित पवार यांनी दुसऱ्यांच्या पक्षात लक्ष देण्यापेक्षा आपल्या पक्षात लक्ष द्यावं, याला देखील यावेळी रोहित पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. का नाही देणार? आम्ही बोलणार तुम्ही जिथे चुकणार तिथे आम्ही बोलणार. ते म्हणत आहेत की, मी खूप कष्ट घेतले, तुम्ही जर कष्ट घेतले असते तर घड्याळाची कोकणात वाताहात झाली नसती. तुम्ही जेव्हापासून तिथे लक्षं घातलं, तेव्हापासून तुम्ही फक्त तुमच्या परिवाराचाच विचार केला. पक्षाचा विचार कधीही केला नाही, म्हणून खऱ्या अर्थाने पक्षाचं नुकसान झालं आहे, असा हल्लाबोल यांनी रोहित पवार यांनी तटकरेंवर केला आहे.


