मुख्याध्यापकाला अटक, ५० हजारांची लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडलं

अंबडच्या तहसिलदाराने लाच घेतल्याचे प्रकरण ताजं असताना नांदेडमध्ये मुख्याध्यापकाने लाच घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. नांदेडच्या हुतात्मा माधव विद्यालयाच्या मुख्याध्यापकाने शालेय खर्चाची रक्कम अॅडजस्ट करणे आणि बदली करण्यासाठी ५० हजारांची लाच मागितल्याचा तक्रार विद्यालयात लिपिकाने केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची शहानिशा केली. त्यानंतर विभागाने राजेश गोविंदराव पडलवार या मुख्याध्यापकावर कारवाई केली आहे. शालेय खर्चाच्या नावाखाली प्रतिमहिना १२ हजार रुपयांप्रमाणे जानेवारी ते मे २०२६ पाच महिन्यांचे हप्ते , तक्रारदाराची बदली करणे, नोटीस न देण्यासाठी मुख्याध्यापकाने ६० हजारांची लाच मागितली होती. लिपीकाने मुख्याध्यपकाच्या जाचाला कंटाळून लिपीकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली. लिपीकाच्या तक्रारीनंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पंचांसमक्ष पडताळणी केली. तक्रारदाराने मुख्याध्यापकाला कॉल केला. त्यानंतर त्यांना नांदेडच्या शारदानगर येथील निवासस्थानी बोलावून घेतलं. त्यावेळी मुख्याध्यापकाने ६० हजारांची लाचेची मागणी केली. त्यानंतर लिपीकाने ५० हजार रुपये देण्याचे मान्य केले. ‘तुला हप्ता देण्याची गरज नाही, तुझी बदली करून घेतो, असे त्यांनी आश्वासन दिले.

एसीबीच्या पथकाने मुख्याध्यापकाच्या घरी सापळा रचला. तक्रारदाराकडून ५० हजारांची लाच घेताना मुख्याध्यापक राजेश पडलवाराला पथकाने रंगेहाथ पकडलं. मुख्याध्यापकाच्या अंगझडतीत मोबाइल,पिवळ्या धातूची अंगठी, ओळखपत्रासहित ५५०० रुपयांची रोख रक्कम सापडली.

नीतिनिकेतन संस्थेचे सचिव अनिल कोल्हे यांनी म्हटलं की, मुख्याध्यापक माझ्या साडूचा मुलगा आहे, तर लिपिक हा पुतण्या आहे. ही घटना परस्परांच्या हातउसण्या रकमेवरून घडली आहे. या प्रकरणात विद्यालयाचा कसलाही संबंध नसून याबाबत माहिती घेऊन लवकरच निर्णय घेणार आहे’.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles