onion price today…आज कांद्याला काय भाव मिळाला? जाणून घ्या आजचे बाजारभाव

onion price today…आज कांद्याला काय भाव मिळाला? जाणून घ्या आजचे बाजारभाव

अहिल्यानगर बाजार समिती आजचे बाजार भाव

दिनांक -8-06–2026 एकुण कांदा गोणी -74,428
गावरान कांदा बाजार भाव

1 नंबर= 1500 ते 1750
2.नंबर= 1000 ते 1500
3 नंबर= 500 ते 1000

4 नंबर= 200 ते 500

————————————————————————————————————————————————–

पारनेर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन प्रक्रियेतील दिरंगाईची आमदार काशिनाथ दाते यांनी गंभीर दखल घेत प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. सतीश लोंढे यांना शवविच्छेदन करण्यात विलंब झाल्याबद्दल जाब विचारला. कर्तव्यात कुचराई करणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्यांवर योग्य ती चौकशी करून कारवाई करण्यात यावी, अशा स्पष्ट सूचनाही आ. दाते यांनी दिल्या.

तालुक्यातील हिवरे कोरडा येथील रमेश बाबासाहेब शेळके यांच्या निधनानंतर त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पारनेर येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला होता. मात्र, तालुक्याचे मुख्य ठिकाण असलेल्या पारनेर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन प्रक्रियेस होत असलेल्या विलंबामुळे नातेवाईकांसह उपस्थित नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते. प्रशासनाच्या उदासीनतेमुळे परिस्थिती अधिक गंभीर बनत असल्याची माहिती मिळताच आमदार काशिनाथ दाते यांनी तातडीने ग्रामीण रुग्णालयात धाव घेत परिस्थितीची पाहणी केली. आ.दाते यांच्या हस्तक्षेपामुळे संबंधित प्रक्रिया वेगाने माग लागली. राष्ट्रवादी काँग्रेस तालुका उपाध्यक्ष प्रितेश पानमंद यावेळी उपस्थित होते.आ.दाते ग्रामीण रुग्णालय पोहोचल्यानंतर नातेवाईक व नागरिकांशी संवाद साधून त्यांची व्यथा जाणून घेतली. ग्रामीण रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. सतीश लोंढे यांना शवविच्छेदन करण्यात विलंब झाल्याबद्दल जाब विचारला. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय घोगरे यांच्याशी संपर्क साधत शवविच्छेदन प्रक्रिया कोणत्याही विलंबाशिवाय पूर्ण करण्याचे निर्देश दिले. कर्तव्यात कुचराई करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर योग्य ती चौकशी करून कारवाई करण्यात यावी, अशा सूचना दिल्या.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles