नगर – मनमाड महामार्गावर अपघात, दुचाकीच्या धडकेत नगर तालुक्यातील एकाचा मृत्यू

अहिल्यानगर -नगर-मनमाड महामार्गावर एका भरधाव अज्ञात दुचाकीने रस्त्याच्या कडेने पायी जाणाऱ्या वृद्धाला पाठीमागून जोराची धडक दिली. या भीषण अपघातात ८५ वर्षीय वृद्धाचा गंभीर दुखापत झाल्याने मृत्यू झाला आहे. अपघात केल्यानंतर दुचाकी चालक पोलिसांना किंवा अपघाताची कोणतीही खबर न देता घटनास्थळावरून फरार झाला आहे. ही घटना ५ जून रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास विळद घाटातील हॉटेल अर्पित समोर घडली.

परसराम काका काळे (वय ८५, रा. वडगाव गुप्ता, ता. नगर) असे अपघातात मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचा मुलगा नवीन परसराम काळे (वय ३९) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मयत परसराम काळे हे ५ जून रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास नगर ते मनमाड रोडने रस्त्याच्या कडेने पायी जात होते. ते विळद घाटातील हॉटेल अर्पित समोर आले असता, पाठीमागून आलेल्या एका अज्ञात दुचाकी चालकाने काळे यांना पाठीमागून जोराची धडक दिली.

या धडकेत गंभीर जखमी झाल्याने काळे यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात ७ जून रोजी अज्ञात दुचाकी चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०६, १२५ (अ) (ब), २७९ सह मोटर वाहन कायदा कलम १३४ (अ) (ब), १७७, १७८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles