Gold-Price: सोन्याच्या दरात मोठा फेरबदल ;जाणून घ्या १० ग्रॅमचा दर….

गेल्या सलग चार सत्रांमध्ये सोन्या-चांदीच्या किमतीत सुरू असलेल्या घसरणीला अखेर आज ब्रेक लागला आहे. आज शुक्रवार, १२ जून २०२६ रोजी भारतीय सराफा बाजारात पुन्हा एकदा तेजीचे जोरदार वारे पाहायला मिळत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी आणि देशांतर्गत बाजारातून अचानक वाढलेल्या मागणीमुळे सोन्या-चांदीच्या भावाने मोठी उसळी घेतली आहे.चार दिवसांच्या घसरणीनंतर आज सकाळी बाजारात सोन्याची मागणी वाढल्याचे दिसून आले. शुद्ध सोने म्हणजेच २४ कॅरेट सोन्याचा भाव आज वाढून प्रति तोळा १५०,६०० रुपयांवर पोहोचला आहे. आठवड्याच्या तुलनेत सोने अजूनही ५००० रुपयांनी स्वस्त मिळत आहे. महिन्याचा विचार केला तर सोन्याची दर ७.५४ टक्के इतके खाली आले आहेत. सोन्याने या वर्षीच्या सुरुवातीला १,८०,००० प्रति १० ग्रॅम या उच्चांकाला स्पर्श केला होता.सोन्याच्या खांद्याला खांदा लावत चांदीच्या किमतीतही आज मोठी तेजी पाहायला मिळाली. गेल्या चार दिवसांत चांदीच्या दरात जी पडझड झाली होती, ती आज काही प्रमाणात भरुन काढली. औद्योगिक क्षेत्रातून वाढलेली मागणी आणि जागतिक बाजारातील खरेदी यामुळे चांदीचा प्रति किलोचा दर पुन्हा एकदा कडाडला आहे. चांदीची आचजी किंमत प्रतिकिलो २,४४,५८० रुपये झाली आहे.इराण-अमेरिका यांच्या लवकरच युद्ध विराम होण्याची शक्यता आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरच्या मूल्यात घसरण झाली आणि अमेरिकन रोख्यांवरील परतावा कमी झाल्यामुळे गुंतवणूकदारांनी पुन्हा एकदा सोन्यात सुरक्षित गुंतवणूक म्हणून खरेदी सुरू केली आहे.
सलग चार दिवस सोने स्वस्त झाल्यामुळे मोठ्या संस्थात्मक गुंतवणूकदारांनी ही खरेदीची नामी संधी मानून बाजारात मोठी गुंतवणूक केली

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles