Saturday, February 21, 2026

छगन भुजबळ यांची कॅबिनेट मंत्री शपथ घेतल्यानंतर……नगर शहरात जल्लोष….

नगर – समता परिषदेचे संस्थापक आणि ओबीसी नेते नामदार छगन भुजबळ यांची कॅबिनेट मंत्री म्हणून निवड झाल्याबद्दल अहिल्यानगर, माळीवाडा येथील महात्मा फुले यांच्या पुतळ्याजवळ समता परिषद व सकल ओबीसी समाज समन्वय समितीच्या वतीने जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी पेढे वाटून व फटाके फोडून कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला.
या प्रसंगी समता परिषदेचे पश्‍चिम विभागीय अध्यक्ष अंबादास गारुडकर, सरचिटणीस अनिल निकम, जि.प. सदस्य शरद झोडगे, माजी महापौर भगवान फुलसौंदर, बाळासाहेब बोराटे, प्रा. संजय गारुडकर, जालिंदर बोरुडे, सदाशिव घाडगे, कैलास हराळे, रामदास फुले, राहुल हजारे, जाधव, मंगल भुजबळ, राजू पडोळे, अमोल घाडगे, बजरंग भुतारे, जाधव, विजय बेलेकर, अंबादास पुंड, भास्कर चौधरी, अर्जुन बोरुडे, भाऊसाहेब पुंड यांच्यासह समता परिषदेचे कार्यकर्तेआणि ओबीसी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना पश्‍चिम विभागीय अध्यक्ष अंबादास गारुडकर यांनी म्हणाले की, नामदार छगन भुजबळ यांची मंत्रिमंडळात झालेली नियुक्ती ही केवळ ओबीसी समाजाची नव्हे, तर सर्वसामान्य जनतेसाठी अभिमानास्पद बाब आहे. त्यांच्या दीर्घ राजकीय अनुभवाचा फायदा राज्याला निश्‍चितच होणार आहे. समता परिषदेच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक न्यायासाठी दिलेला लढा आता मंत्रिपदाच्या माध्यमातून अधिक प्रभावीपणे पुढे नेला जाईल.
सरचिटणीस अनिल निकम यांनी आपल्या भाषणात सांगितले की, भुजबळ साहेब हे नेहमीच सर्वसामान्यांच्या हक्कासाठी लढत आले आहेत. त्यांची ही निवड म्हणजे सामाजिक समतेच्या चळवळीला नवे बळ मिळण्याची सुरूवात आहे. समता परिषद व ओबीसी समाज हा भुजबळ साहेबांच्या विचारांची प्रेरणा घेऊन समाजहितासाठी काम करत राहील.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles