खासदार बजरंग सोनवणे यांच्या अडचणीत वाढ, बीडच्या विलास घुले हत्या प्रकरणात मुलाचं नाव

बीडमधील विलास घुले हत्या प्रकरणात खासदार बजरंग सोनवणे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. या हत्या प्रकरणात दिलेल्या जबाबात खासदारपुत्र सौरभ सोनवणे याचं नाव समोर आल्यामुळे चर्चेला उधाण आले आहे. सौरभ सोनवणे याचा या प्रकरणात पोलिसांनी जबाब नोंदवून घेतला. या खुलाशामुळे प्रकरणाला नवं वळण मिळालं असून राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. जबाबातील या उल्लेखामुळे तपास यंत्रणांसमोर अनेक नवे प्रश्न निर्माण झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, खासदार बजरंग सोनवणे यांच्या सौरव सोनवणे या मुलाचे पुरवणी जबाबत नाव आले असल्याची माहिती पोलिस सुत्रांनी दिली आहे. तपासात काही निष्पन्न न झाल्यास नाव वगळले जाणार आहे. खासदार बजरंग सोनवणे यांच्या मुलाचे नाव पुरवणी जबाबात घेतल्यामुळे अडचणीत वाढ होणार आहे. बीडच्या केज तालुक्यातील टाकळी येथील विलास घुले हत्या प्रकरणाला नवे वळण लागले असून या हत्या प्रकरणांमध्ये काल दिवसभर नातेवाईक तसेच सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक केज पोलिस ठाण्यासमोर ठिय्या मांडून बसले होते.

विलास घुले प्रकरणात बजरंग सोनवणे यांच्या मुलावर अनेक आरोप केले जात आहेत. मात्र बजरंग सोनवणे यांच्याकडून सांगण्यात आले आहे की, विनाकारण चुकीच्या पद्धतीने दबाव आणला जात असून आमचा त्या प्रकरणाशी कुठलाही संबंध नाही सीडीआर चेक करा सीसीटीव्ही चेक करा जे करायचे ते करा दोषी निघाल्यास कारवाई करा. मात्र या प्रकरणात अद्यापपर्यंत ९ आरोपीविरोधात गुन्हा दाखल झाला असून ८ आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. रात्री उशिरा विलास घुलेचा मृतदेह नातेवाईकांकडून ताब्यात घेण्यात आला असून पोलिस अधीक्षक नवनीत कावत हे पोलिस ठाण्यामध्ये तळ ठोकून होते.

पोलिस अधीक्षकांच्या आश्वासनानंतर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा केज पोलिस ठाण्यासमोरील आंदोलकांना फोन गेल्यानंतर मृतदेह ताब्यात घेण्यात आला. या प्रकरणांमध्ये खासदार बजरंग सोनवणे यांच्या मुलाचा पुरवणी जबाबामध्ये नाव घेण्यात आले आहे. यामुळे बजरंग सोनवणे यांच्या अडचणीमध्ये वाढ होणार असल्यास बोलले जात आहे. त्याचबरोबर पोलिस अधीक्षक यांनी सांगितले की, या प्रकरणात आणखी काय समोर येते आणि या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन जे खरे असेल ते समोर येईल. जे चुकीच्या पद्धतीने कोणी जर करत असेल तर तुमच्यावर ही कारवाई करण्यात येईल.

घुले हत्या प्रकरणात नाव आल्यानंतर, तसेच आरोप झाल्यानंतर सौरभ सोनवणे याने व्हिडिओच्या माध्यमातून आरोप फेटाळले आहेत. घुले यांची हत्या झाली त्या दिवशी कुठे होतो, काय काय केलं, याची माहिती त्यानं दिली. विलास घुलेची हत्या ही दुर्दैवी घटना आहे. या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे. घटनेच्या दिवशी मी येडेश्वरी कारखान्यावर होतो. दुपारी आलो तिथून मी घरीच होतो. दुसऱ्या दिवशीही सकाळी मी घरीच होतो. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले आहेत. माझी गाडीही घराजवळच होती, असे त्यातून स्पष्ट झाले आहे, असे सौरभने सांगितले.

या प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी झाली पाहिजे. तसेच सत्य समोर आले पाहिजे. कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास मी तयार आहे. मात्र, माझा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. पोलिसांनी कॉल रेकॉर्ड तपासले आहेत. वस्तुस्थिती त्यातून स्पष्ट होईल. या घटनेमागील सत्य पोलीस प्रशासन जनतेसमोर नक्की आणेल, असंही सौरभ याने सांगितले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles