बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील टाकळी येथील तरुण विलास घुले याच्या हत्या प्रकरणाला आता अत्यंत महत्त्वाचे वळण मिळाले आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाकडून आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे यांचे चिरंजीव सौरव सोनवणे यांची सखोल चौकशी केली जाणार आहे.माहितीनुसार, सौरव सोनवणे आज दुपारी स्वतः केज पोलीस ठाण्यात हजर राहून या चौकशीला सामोरे जाणार आहेत.विलास घुले हत्या प्रकरणात फिर्यादीने नोंदवलेल्या पुरवणी जबाबात खासदार बजरंग सोनवणे यांचे सुपुत्र सौरव सोनवणे यांच्या नावाचा उल्लेख केला आहे. या गंभीर प्रकरणामध्ये सौरव सोनवणे यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करत आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. या पार्श्वभूमीवर, बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावँत यांनी पुरवणी जबाबात नाव आल्यामुळे सत्य शोधण्यासाठी एसआयटीने सौरव सोनवणे यांना चौकशीसाठी पाचारण करण्यात येणार असल्याची माहिती दिली होती. तर, “पोलीस प्रशासन ज्या ज्या वेळी तपासासाठी बोलावेल, त्या त्या वेळी आम्ही पूर्ण सहकार्य करू,” अशी भूमिका यापूर्वीच खासदार बजरंग सोनवणे आणि सौरव सोनवणे यांनी माध्यमांसमोर स्पष्ट केली होती. त्यानुसार आज ते स्वतःहून पोलिसांसमोर हजर होत आहेत.
केज तालुक्यातील टाकळी येथे 20 जूनच्या रात्री हत्येचा कट रचून एका व्यक्तीवर हल्ला करण्यात आला होता. हा वाद सोडवण्यासाठी मध्यस्थी करायला आलेल्या विलास घुले या निष्पाप तरुणावर आरोपींनी जीवघेणा वार केला, ज्यामध्ये त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर बीड जिल्हा संतप्त झाला होता. मुख्य आरोपींच्या अटकेसाठी तब्बल तीन दिवस रास्ता रोको आंदोलन करण्यात आले, तसेच विलास घुले यांचा मृतदेह तब्बल नऊ तास पोलीस ठाण्यासमोर ठेवून नातेवाईकांनी प्रशासनाचा निषेध केला होता. पोलिसांनी या प्रकरणात वेगाने तपासाची चक्रे फिरवत विविध ठिकाणाहून एकूण 9 आरोपींना अटक केली आ


