onion price today…आज कांद्याला काय भाव मिळाला? जाणून घ्या आजचे बाजारभाव

onion price today…आज कांद्याला काय भाव मिळाला? जाणून घ्या आजचे बाजारभाव

अहिल्यानगर बाजार समिती आजचे बाजार भाव

दिनांक -29-06–2026 एकुण कांदा गोणी -1,15,580
गावरान कांदा बाजार भाव

1 नंबर= 2200 ते 2650
2.नंबर= 1500 ते 2200
3 नंबर= 800 ते 1500

4 नंबर= 300 ते 800

————————————————————————————————————————————————–
महिलेच्या गळ्यातील चैन हिसकावली
अहिल्यानगर-शहरातील बालिकाश्रम रोड परिसरात दुचाकीवरून जाणार्‍या महिलेच्या गळ्यातील सुमारे दोन तोळे वजनाची सोन्याची चैन दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत तरुणा कालडा (वय 44, रा. बागरोजा हाडको, दिल्लीगेट, अहिल्यानगर) यांनी शनिवारी (27 जून) तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, 23 जून रोजी सकाळी 8.48 वाजता त्या त्यांच्या एमएच-16 बीडब्ल्यू-3915 क्रमांकाच्या दुचाकीवरून बालिकाश्रम रोडने जात होत्या.

सुखदा हॉस्पिटलसमोरील रस्त्यावर स्पीड ब्रेकर आल्याने त्यांनी दुचाकीचा वेग कमी केला. त्याचवेळी दुचाकीवरून आलेल्या दोन इसमांपैकी मागे बसलेल्या, इसमाने त्यांच्या गळ्यातील सुमारे दोन तोळे वजनाची, सोन्याची चैन बळजबरीने ओढून हिसकावली आणि दोघेही घटनास्थळावरून वेगाने पसार झाले. या घटनेनंतर तरूणा यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात शनिवारी माहिती दिली. त्यांच्या फिर्यादीवरून जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश चाहेर करीत असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयित आरोपींचा शोध घेण्यात येतआहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles