नगर तालुक्यात युवतीचा विनयभंग व फोटो व्हायरल करण्याची धमकी

अहिल्यानगर-एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका युवतीचा विनयभंग करून तिच्यासह भावाला धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पीडित युवतीने (वय 18) दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात रविवारी (28 जून) चौघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सार्थक कराळे (पूर्ण नाव माहिती नाही, रा. वडगाव गुप्ता, ता. अहिल्यानगर) आणि त्याच्यासोबत असलेल्या इतर तीन अनोळखी विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वडगाव गुप्ता परिसरातील साईराजनगर येथील भाऊच्या ढाब्याजवळ 26 जून रोजी सायंकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली. सार्थक कराळे याने फिर्यादीला गाठून तू मला आवडतेस असे म्हणत तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले होते. एवढ्यावरच न थांबता, माझ्याकडे तुझे फोटो आहेत आणि ते मी सर्वत्र व्हायरल करेन, अशी धमकीही त्याने फिर्यादीला दिली होती.

या छळाबाबत नातेवाईकांना माहिती मिळाल्यानंतर, संशयित आरोपींनी फिर्यादीच्या भावाला रस्त्यात गाठले. त्यांनी भावाला शिवीगाळ करत तुझ्या अंगावर अ‍ॅसिड फेकून मारून टाकीन, अशी धमकी देऊन संशयित तेथून पळून गेल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या सततच्या त्रासाला आणि धमक्यांना कंटाळून शेवटी पीडित युवतीने एमआयडीसी पोलीस ठाणे गाठून माहिती दिली. पोलिसांनी संशयित सार्थक कराळे व त्याच्या तीन साथीदारांवर गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अंमलदार शिंदे करीत आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles