विधान परिषद उपसभापतींची बुधवारी निवड;निलम गोऱ्हे यांनाच पुन्हा संधी !

विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी बुधवारी निवडणूक होणार आहे. मावळत्या उपसभापती निलम गोऱ्हे यांचीच पुन्हा निवड होते की हेमंत पाटील यांना संधी मिळते याची शिवसेना शिंदे गटात चर्चा आहे.

जाहीर करण्यात आलेल्या कार्यक्रमानुसार, मंगळवारी दुपारी १२ वाजेपर्यंत इच्छुकांना नामनिर्देशन अर्ज दाखल करता येणार आहेत. त्यानंतर दुपारी १ वाजता अर्जांची छाननी होईल. १ जुलै रोजी मतदान होणार असून, बिनविरोध निवड झाल्यास त्याच दिवशी उपसभापतीची घोषणा केली जाईल. शिवसेनेत सध्या हेमंत पाटील आणि डॉ. नीलम गोऱ्हे यांचे नाव चर्चेत आहे. मात्र तरीही महिला सदस्य म्हणून तसेच ठाकरे गटाच्या उपसभापती असतानाही शिंदे गटात प्रवेश करून सभागृह चालवल्याने पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांच्याकडून त्यांनाच संधी दिली जाण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीकडे आवश्यक संख्याबळ नसल्याने ही निवडणूक झाली तरी एकतर्फी होईल.

विधान परिषदेचे उपसभापती पद हे अत्यंत महत्त्वाचे आणि संविधानिक पद आहे. भारतीय संविधानाच्या कलम 182 नुसार, विधान परिषद असलेल्या प्रत्येक राज्याने आपल्या सदस्यांमधून एका सभापतीची आणि एका उपसभापतीची निवड करणे बंधनकारक असते. सभापतींच्या अनुपस्थितीत सभागृहाचे कामकाज चालवणे, सदस्यांच्या वर्तनावर नियंत्रण ठेवणे आणि संसदीय नियमांचे पालन करवून घेण्याचे सर्वाधिकार उपसभापतींकडे असतात. राज्याच्या वरिष्ठ सभागृहात हे पद राजकीयदृष्ट्या अत्यंत प्रतिष्ठेचे मानले जाते.
विधान परिषदेतील संख्याबळ

भाजप : ३५

शिवसेना (शिंदे गट) : १२

राष्ट्रवादी (अजित पवार) : १०

शिवसेना (ठाकरे गट) : ०६

काँग्रेस : ०५

राष्ट्रवादी (शरद पवार) : ०२

अपक्ष : ०३

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles