एकनाथ शिंदेंनी पुन्हा डाव टाकला, आणखी एक आमदार फुटला ;शिंदे म्हणाले….

राज्याच्या राजकारणात गेल्या काही काळापासून मोठ्या घडामोडी घडत आहेत. गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेच्या ताकदीत मोठी वाढ झाली आहे. आठवडाभरापूर्वी उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील 6 खासदारांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर काल ठाकरे गटाचे विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनीही एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश केला. त्याआधी अपक्ष आमदार यांनीही सहयोगी सदस्य म्हणून शिवसेनेसोबत काम करण्याचा निर्णय घेतला होता. आता पुन्हा एकदा शिवसेनेची ताकद वाढली आहे. शिक्षक आमदार किरण सरनाईक यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. ते शिवसेनेचे सहयोगी सदस्य म्हणून काम करणार आहेत.किरण सरनाईक यांच्या पाठिंब्यावर बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, सरनाईक यांनी अधिकृतपणे शिवसेनेचे सहयोगी सदस्य म्हणून काम करण्याचा निर्णय घेतला आहे. या राज्यामध्ये शिवसेना काम करत आहे. शिवसेनेचे काम पाहून सहयोगी सदस्य काम करण्याचा मार्ग त्यांनी स्वीकारला आहे. अमरावती शिक्षक मतदार संघातून सरनाईक निवडून आलेले आहेत. शिवसेना दिलेला शब्द पाळते.

एकनाथ शिंदे म्हणाले, मागील आठवड्यात सहा खासदार शिवसेना पक्षात सामील झाले. त्यानंतर विधानपरिषदेचे आमदार सचिन अहिर देखील शिवसेनेत आले. आपल्याकडे आधीच प्रताप सरनाईक आहेत. त्यानंतर दुसरे एक सरनाईक पक्षात येत आहे. आता शिक्षक आमदार किरण सरनाईक पक्षात येणार आहेत. ते शिवसेनेचे सहयोगी सदस्य म्हणून काम करणार आहेत. मी त्यांचं मनापासून शिवसेनेत स्वागत करतो’

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles