महाराष्ट्रात नवजात बाळाच्या विक्री रॅकेटचा पर्दाफाश, भाजपच्या २ महिला नेत्यांना अटक

द्रपूरमध्ये नवजात बाळ विक्री रॅकेटचा पर्दाफाश

भाजपच्या २ महिला पदाधिकाऱ्यांना पोलिसांकडून अटक

बाळाच्या विक्री प्रकरणात आतापर्यंत अनेकांना अटक

पोलिसांकडून अधिक तपास सुरू
नवजात बाळांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आणणारं एक मोठं रॅकेट उघडकीस आलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांना अटक केली आहे. दोन्ही महिला पदाधिकाऱ्यांवर या रॅकेटमध्ये सहभाग असल्याचा आरोप आहे. दोघींनी दलालाची भूमिका निभावल्याचा आरोप आहे. याबाबत काही पुरावे हाती येताच पोलिसांनी दोघींना बेड्या ठोकल्या आहे. या दोन्ही महिला पदाधिकारी एका भाजप आमदाराच्या निकटवर्तीय मानल्या जातात.रामनगर पोलिसांनी बुधवारी सायंकाळी ही मोठी कारवाई केली. अटक करण्यात आलेल्या महिलांमध्ये सायली येरणे (भाजप महिला आघाडी पदाधिकारी) आणि भाग्यश्री हांडे (भाजप युवती आघाडी सरचिटणीस) यांचा समावेश आहे. या दोन्ही महिला पदाधिकारी भाजपचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या कट्टर समर्थक मानल्या जातात. गुरुवारी या दोघींनाही न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मे २०२६ मध्ये या रॅकेटचा मुख्य आरोपी अजय फुलझेले याने नागपुरात नवजात बाळाची विक्री करण्याचा कट रचला होता. तिथूनच या संपूर्ण प्रकरणाचे बिंग फुटले. या प्रकरणात पीडित अल्पवयीन मुलीची आई तसेच नवजात बालक खरेदी करणाऱ्या हैदराबाद आणि चंद्रपूर येथील दोन महिलांना आधीच अटक करण्यात आली आहे.तपासामध्ये समोर आले की, सायली येरणे आणि भाग्यश्री हांडे यांनी नवजात बालकांच्या विक्रीत मध्यस्थाची भूमिका बजावली होती, तसेच आवश्यक कागदपत्रांची पूर्तता आणि इतर प्रक्रियेत मदत केली होती. या सर्व आरोपींविरुद्ध मानवी तस्करी तसेच पॉक्सो कायद्यांतर्गत गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली रामनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके आणि त्यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे. बाळ विक्रीच्या या साखळीत आणखी कोणाचा सहभाग आहे का, तसेच यामागे कोणते संघटित रॅकेट कार्यरत आहे का, याचा कसून तपास सुरू आहे

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles