भिंगारमध्ये युवकावर कोयत्याने हल्ला; पाच जणांविरूध्द पोलिसात गुन्हा दाखल

अहिल्यानगर -येथील भिंगार रस्त्यावरील फुटबॉल मैदानाजवळ पूर्ववैमनस्यातून एका युवकावर कोयता आणि बांबूच्या दांडक्याने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात उदय अब्राहम ढगे (वय 21, रा. शांतीनगर, केदारवस्ती, सोलापूर रोड) हे जखमी झाले असून, त्यांच्यावर जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

उपचारादरम्यान त्यांनी दिलेल्या जबाबावरून नीलेश शिंदे (पूर्ण नाव माहिती नाही, रा. भिंगार) आणि त्याच्या इतर चार अनोळखी साथीदारांविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी उदय ढगे हे कोठी मार्केटयार्ड रस्त्यावरील एका रूग्णालयात सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात.

28 जून रोजी दुपारच्या सुमारास नगर कॉलेजजवळ उदय आणि नीलेश यांच्यात रागाने पाहण्याच्या कारणावरून शाब्दिक वाद झाला होता. 29 जून रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास नीलेश एका अनोळखी साथीदारासह रूग्णालयासमोर आला आणि जुने वाद मिटवण्याच्या बहाण्याने उदय यांना भिंगार रस्त्यावरील फुटबॉल मैदानावर घेऊन गेला.

मैदानावर आधीच दबा धरून बसलेल्या इतर तीन अनोळखी साथीदारांच्या मदतीने उदय यांना बांबूच्या दांडक्याने आणि कोयत्याने मारहाण करून जखमी केले. नागरिकांची गर्दी जमा होताच संशयित दुचाकीवरून पसार झाले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles