सोनं-चांदीच्या दरात गेल्या काही दिवसांपासून चढ-उतार पाहायला मिळत आहे. या आठवड्यात सोन्याच्या दरात सतत घसरण झाली आहे. सलग पाचव्या दिवशी सोनं स्वस्त झालं आहे. आज चांदीच्या दरात देखील घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. सोनं-चांदीच्या दरात घसरण झाल्यामुळे खरेदीची सुवर्णसंधी आहे. २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये ७६० रुपयांची घसरण झाली आहे. २४ कॅरेटसोबत आज २२ आणि १८ कॅरेटच्या सोन्याच्या दरात देखील मोठी घसरण झाली आहे. आज तुम्ही सोनं खरेदी करण्यासाठी जाणार असाल तर आजचे २४,२२ आणि १८ कॅरेट सोन्याचे दर किती ते जाणून घ्या…
गुड रिटर्न्सने दिलेल्या माहितीनुसार, आज २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये तब्बल ७५० रुपयांची घसरण झाली. हे सोनं खरेदी करण्यासाठी ग्राहकांना १,४२,५३० रुपये खर्च करावे लागणार आहेत. तर २४ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये ७,६०० रुपयांची घसरण झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी आज तुम्हाला १४,२५,३०० रुपये खर्च करावे लागणार आहे. जर सोन्यामध्ये जक तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर आज चांगली संधी आहे.
सोन्याचे दागिने हे २२ कॅरेटमध्ये बनवले जातात. त्यामुळे हे सोनं खरेदीवर ग्राहकांचा भर असतो. आज तुम्ही सोन्याचे दागिने देखील कमी दरात बनवू शकता. आज २२ कॅरेटच्या सोन्याच्या दरात देखील मोठी घसरण झाली. २२ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये ७०० रुपयांची घसरण झाली. हे सोनं खरेदीसाठी तुम्हाला १,३०,६५० रुपये खर्च करावे लागतील. तर २२ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये ७००० रुपयांची घसरण झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी तुम्हाला १३,०६,५०० रुपये मोजावे लागतील.
२४ आणि २२ कॅरेट सोन्यापाठोपाठ आज १८ कॅरेटचं सोन्याच्या दरात देखील मोठी घसरण झाली आहे. १८ कॅरेटचे १ तोळा सोनं ५७० रुपयांनी स्वस्त झालं आहे. हे सोनं खरेदीसाठी तुम्हाला १,०६,९०० रुपये मोजावे लागतील. तर १८ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये ५७०० रुपयांची घसरण झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी तुम्हाला १०,६९,७०० रुपये खर्च कारवे लागतील.
आज सोन्यापाठोपाठ चांदीच्या दरात देखील मोठी घसरण झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चांदीचे दर स्थिर होते पण आता घसरण झाल्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला. आज १ ग्रॅम चांदी ५ रुपयांनी स्वस्त झाली आहे. ही चांदी आज २३० रुपयांना विकली जात आहे. तर १ किलो चांदीच्या दरात ५००० रुपयांची घसरण झाली आहे. ही चांदी २,३०,००० रुपयांना विकली जात आहे.


