राज्यात 4 हजार 943 अंगणवाडी पदांची मेगाभरती; आजपासून अर्ज सुरु

महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. महिला व बालविकास विभागामार्फत राज्यभरात अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस पदांसाठी मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या भरतीअंतर्गत एकूण 4,943 रिक्त पदे भरली जाणार असून, पात्र महिला उमेदवारांकडून आजपासून 20 जुलै ते 31 जुलै 2026 या कालावधीत अर्ज स्वीकारले जाणार आहेत.

भरती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अंतिम निवड झालेल्या उमेदवारांना 27 ऑगस्ट 2026 रोजी नियुक्तीपत्रे देण्यात येणार आहेत.एकूण किती पदांसाठी भरती

या भरती मोहिमेत खालील पदांचा समावेश आहे.

अंगणवाडी सेविका : 1,015 पदे

अंगणवाडी मदतनीस : 3,928 पदे

अशाप्रकारे राज्यभरात 4,943 पदांवर भरती केली जाणार आहे.
कोणाला अर्ज करता येणार?

ही भरती विशेषतः ग्रामीण आणि शहरी भागातील पात्र महिला उमेदवारांसाठी आहे. सरकारी सेवेत काम करण्याची इच्छा असलेल्या तसेच बालकांच्या पोषण, आरोग्य आणि शिक्षणाशी संबंधित क्षेत्रात समाजसेवेची आवड असलेल्या महिलांसाठी ही सुवर्णसंधी मानली जात आहे.भरतीचे वेळापत्रक

महिला व बालविकास विभागाने भरती प्रक्रियेचे वेळापत्रकही जाहीर केले आहे.

ऑनलाइन/अर्ज स्वीकारण्याचा कालावधी : 20 जुलै ते 31 जुलै 2026

अर्जांची छाननी : 3 ते 7 ऑगस्ट

गुणवत्ता यादीची पडताळणी : 10 ते 12 ऑगस्ट

हरकती व आक्षेप नोंदविण्याचा कालावधी : 13 ते 26 ऑगस्ट

अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध व नियुक्तीपत्र वितरण : 27 ऑगस्ट 2026
अर्ज सादर करण्यापूर्वी संबंधित जिल्हा प्रशासन किंवा महिला व बालविकास विभागाने प्रसिद्ध केलेली अधिकृत भरती जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. त्यामध्ये नमूद केलेली शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, आरक्षण, आवश्यक कागदपत्रे आणि इतर अटी तपासूनच अर्ज करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles