Friday, February 20, 2026

मोठा गौप्यस्फोट ‘गृहमंत्री पदासाठी हसन मुश्रीफ हे उत्तम चॉईस होते, पण धर्म आडवा आला…..

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांचं ‘नरकातला स्वर्ग’ हे पुस्तक सध्या चांगलंच चर्चेत आहे. या पुस्तकात संजय राऊत यांनी पडद्यामागील अनेक राजकीय घडामोडींचा गौप्यस्फोट केला आहे. राज्यात २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना आणि भाजपची युती तुटली. दोन्ही पक्षांनी युतीत निवडणूक लढवली असली तरी अनेक मतदारसंघात बंडखोरी झाली होती. तसेच निकालानंतर अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाचा शिवसेनेचा आग्रह होता. ते भाजपला अमान्य होतं. यामुळे शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सोबत हातमिळवणी करत महाविकास आघाडीची स्थापना केली. किमान समान वाटपाच्या धर्तीवर तीनही पक्षांचं एकमत झालं आणि महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं. सरकार स्थापनेवेळी गृह खातं हे राष्ट्रवादीला मिळालं. त्यावेळी हसन मुश्रीफ हे गृहमंत्री पदासाठी उत्तम चॉईस ठरले असते, असं संजय राऊतांनी आपल्या पुस्तकात म्हटलं आहे.

“महाविकास आघाडी सरकारचे बाळंतपण साधे नव्हते. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावर गृहखाते कोणाकडे जाणार यावर पैजा लागल्या. अजित पवार पहाटेचा शपथविधी आटोपून रिक्त हस्ते पुन्हा स्वगृही परतले होते. त्यांचा विचार होईल, असे मला वाटले नव्हते. छगन भुजबळ हे तुरुंगातून सुटून आले तरी त्यांच्यावर खटले चालू होते. भुजबळ यांची गृहमंत्री होण्याची इच्छा प्रबळ होती. त्यांच्यात क्षमताही होती पण त्यांच्या तुरुंग प्रवासाची अडचण ठरली असावी”, असं संजय राऊत पुस्तकात म्हणाले आहेत.

“जयंत पाटील यांना गृहमंत्रिपदाची जबाबदारी नकोच होती. ‘तो एक थैंकलेस जॉब आहे,’ असे त्यांचे म्हणणे होते. वळसे-पाटील यांच्या प्रकृतीच्या कुरबुरी होत्या. कोल्हापूरचा हसन मुश्रीफ हा एक रांगडा व तगडा गडी. मुश्रीफ हे एक उत्तम चॉईस ठरले असते. परंतु ते मुसलमान असल्याने प्रत्येक गोष्टीत त्यांना टार्गेट केले जाईल, अशी भीती पवारांना वाटली. खरं तर मुश्रीफ हे कमालीचे पुरोगामी. पक्के निधर्मी आणि दिलखुलास व्यक्तिमत्त्व. शाहू महाराजांवर अपार श्रद्धा असलेले कार्यकर्ते पण शेवटी धर्म आडवा आला”, असं मोठं वक्तव्य संजय राऊत यांनी पुस्तकात केलं आहे.

“गृहमंत्री कोण? या प्रश्नावर एकदा पवार म्हणाले, “विदर्भातला नवा प्रयोग करून पाहू या!” तो प्रयोग म्हणजे अनिल देशमुख. देशमुखांनी गृहखाते उत्तमरीत्या सांभाळले. मुख्यमंत्री ठाकरे यांच्याशी त्यांचे उत्तम नाते होते. पण तीन प्रमुख पक्षांत बदल्या, बढत्या आणि नेमणुकांच्या कटकटी असतात. त्या देशमुखांच्या वाट्याला आल्या. देशमुख हे नागपूरचे. त्याआधी फडणवीस हेच नागपूरचे सत्ताकेंद्र होते. देशमुख गृहमंत्री होताच सर्व काही बदलले. देशमुखांचा नागपूर-विदर्भातील वाढता प्रभाव, गृहखात्याचे वलय, त्यांना मिळणारे सॅल्यूट हे जुन्या सत्ताकेंद्रास सहन झाले नाहीत आणि तेथूनच देशमुखांच्या रस्त्यात काटे नि

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles