अहिल्यानगर जिल्ह्यात ग्रामपंचायतीत प्रशासक राज वाढणार; 843 ग्रामपंचायतींची मतदार यादी रखडली

अहिल्यानगर-जानेवारी २०२४ ते डिसेंबर २०२६ दरम्यान मुदत संपलेल्या, तसेच नव्याने तयार झालेल्या नगर जिल्ह्यात ८४३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी २४ जुलैला प्रारूप मतदार यादी प्रसिध्द होणार होती. मात्र, राज्यात अनेक ठिकाणी ऑनलाईन मतदार यादी प्रसिध्द करण्यावरून गोंधळ झाला. यामुळे शुक्रवार (दि. २४) रोजी ग्रामपंचायत निवडणुकीची प्रारूप मतदार यादी प्रसिध्द करण्याची प्रक्रिया लांबली आहे. आता राज्य निवडणूक आयोगाकडून येणाऱ्या आदेशानुसार पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे जिल्हा ग्रामपंचायत निवडणूक विभागाच्या सुत्रांकडून सांगण्यात आले.

अहिल्यानगर जिल्ह्यात ८५० हून अधिक ग्रामपंचायतीच्या निवडणुका विविध कारणांनी रखडल्या आहेत. यातील बहुतांश ग्रामपंचायतीवर प्रशासक राज आहे. निवडणुका रखडल्याने या ठिकाणी इच्छुकांमध्ये नाराजी असून काही ठिकाणी प्रशासकाच्या कामकाजावर ही बोटे मोडण्यात येत आहेत. दुसरीकडे गेल्या वर्षभरात ठराविक स्थानिक स्वराज्य संस्था वगळता राज्यातील बहुतांश ठिकाणी निवडणुका पार पडलेल्या आहेत. नगर जिल्ह्यात २०२२ पासून जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि पाठोपाठ ८४३ ग्रामपंचायतींच्या निवडणूक रखडलेल्या आहेत. यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी जुलैच्या पहिल्या आठवड्यात प्रभागनिहाय आरक्षण निश्चित झाल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने मतदार यादीची कार्यक्रम जाहीर केला होता.

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी १५ एप्रिल २०२६ रोजी अस्तित्वात असलेली विधानसभेची मतदार यादी वापरली जाणार होती. त्यानूसार प्रभागनिहाय प्रारुप मतदार यादी २४ जुलै प्रसिद्ध करण्यात येणार होती. त्यावर हरकती आणि सुचना घेवून येत्या ४ ऑगस्ट रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार होती. त्यासाठी राज्यात पहिल्यांदा ऑनलाईन पध्दतीने मतदार याद्या प्रसिध्द करण्यात येणार होत्या. नगरसह राज्यात अनेक ग्रामपंचायतींना ऑनलाईन पध्दतीने या याद्या प्रसिध्द करण्यात आल्या नाहीत. यामुळे प्रारूप मतदार यादी प्रसिध्द करण्याची तारखी पुढे ढकलण्याची मागणी राज्यातील अनेक जिल्ह्यातून झाली. यामुळे राज्य निवडणूक आयोगाने ही प्रक्रिया पुढे ढकली असल्याचे सांगण्यात आले. तसेच नव्याने मतदार यादी कार्यक्रम जाहीर करण्यात येणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.

राहाता २५, अकोले ५२, जामखेड ४९, शेवगाव ४८, संगमनेर ९४, पारनेर ८८, पाथर्डी ७९, श्रीगोंदा ६२, नगर ६०, नेवासा ५९, कर्जत ५५, राहुरी ४४, कोपरगाव २९, श्रीरामपूर २७ यांचा समावेश आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles