नगरकरांना दिलासा घरगुती गॅस पाइपलाइन प्रकल्प तातडीने पूर्ण करण्याची केंद्र सरकारकडे ठाम मागणी

अहिल्यानगरकरांना दिलासा मिळावा; घरगुती गॅस पाइपलाइन (PNG) प्रकल्प तातडीने पूर्ण करण्याची केंद्र सरकारकडे ठाम मागणी!
अहिल्यानगर शहरात भारत गॅस रिसोर्सेस लिमिटेड (BGRL) मार्फत सुरू असलेल्या घरगुती पाइपलाइन नैसर्गिक वायू (PNG) प्रकल्पाचे काम रखडल्यामुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. अनेक ठिकाणी रस्ते खोदून कामे अपूर्ण अवस्थेत सोडल्याने वाहतुकीस अडथळे निर्माण होत असून नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे.
या गंभीर बाबीची दखल घेत केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्री मा. हरदीपसिंहजी पुरी यांना पत्र पाठवून महानगरपालिकेकडील प्रलंबित परवानग्या तात्काळ मंजूर कराव्यात, प्रकल्पाची सर्व कामे निश्चित कालमर्यादेत पूर्ण करावीत, खोदकाम झालेल्या सर्व रस्त्यांची दर्जेदार दुरुस्ती करावी, नागरिकांना लवकरात लवकर घरगुती PNG गॅस जोडणी उपलब्ध करून द्यावी तसेच प्रकल्पातील विलंबाची सखोल चौकशी करून जबाबदारांवर योग्य ती कारवाई करावी, अशी ठाम मागणी केली आहे.
अहिल्यानगरकरांना सुरक्षित, किफायतशीर आणि पर्यावरणपूरक घरगुती गॅस सुविधा वेळेत उपलब्ध व्हावी, यासाठी माझा केंद्र सरकारकडे सातत्यपूर्ण आणि प्रभावी पाठपुरावा कायम राहील. जनतेच्या प्रत्येक प्रश्नासाठी कटिबद्ध राहून अहिल्यानगरच्या सर्वांगीण विकासासाठी मी सदैव प्रयत्नशील आहे

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles