सुप्रिया सुळेंच्या लेकीच्या रिसेप्शनला पुढाऱ्यांची मांदियाळी; पंतप्रधान मोदींच्या खास गप्पा, अमित शाह-राहुल गांधी एकाच ठिकाणी

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे यांची लेक रेवती सुळे हिचा काही दिवसांपूर्वी मुंबईत विवाह सोहळा संपन्न झाला होता. त्यानंतर काल दिल्लीत रिसेप्शन समारंभ पार पडला. या समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी ते देशभरातील विविध पक्षांचे नेते उपस्थित राहिले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांसमवेत बसून कुटुंबीयांशी संवाद साधल्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी गेल्या काही दिवसांत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर पडद्यामागून घडामोडी घडत असल्याची राजकीय चर्चा होती. मात्र स्वतः शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी ही चर्चा फेटाळून लावली. या समारंभाचे निमंत्रण देण्यासाठी काही भेटीगाठी घेतल्या गेल्या होत्या, असे सांगितले जात आहे.
https://x.com/montana9_/status/2086855341833412663?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E2086855341833412663%7Ctwgr%5E87a2224fac1c318dfccd98314d88b2f7ed8548e2%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.loksatta.com%2Fdesh-videsh%2Fsupriya-sule-daughter-revathi-sule-wedding-reception-sharad-pawar-meet-pm-modi-amit-shah-rahul-gandhi-delhi-kvg-85-6070324%2F
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी २० जुलैनंतर एकदाही संसदेच्या अधिवेशनाला हजेरी लावलेली नाही. यावरून विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी जोरदार टीका केलेली आहे. विद्यार्थ्यांच्या मोर्चात झालेला लाठीमार आणि पॅलेट गनच्या वापराची परवानगी कुणी दिली? याची जबाबदारी निश्चित केली जावी, अशी राहुल गांधी यांची मागणी आहे.भाजपावर आणि केंद्र सरकारवर खरपूस टीका करणारे आमदार रोहित पवार या समारंभात पंतप्रधान मोदींशी हितगुज साधताना दिसून आले. पवार कुटुंबातील सदस्यांची पंतप्रधान मोदींशी भेट घालून देण्यात आली. यावेळी पंतप्रधान मोदी आणि रोहित पवार यांच्यात काही वेळ संवाद झाला. यावेळी युगेंद्र पवार आणि त्यांच्या पत्नीही उपस्थित होत्या. सुप्रिया सुळेंनी पवार कुटुंबातील सदस्यांची ओळख करून दिली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles