टीम इंडियाच्या कसोटी सामन्याआधी खळबळ,श्रीलंकेच्या खेळाडूने संघाच्या कोचला संपवलं; क्रिकेटपटूला अटक

भारत आणि श्रीलंका यांच्यात 15 ऑगस्टपासून दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरू होत असतानाच श्रीलंकेच्या क्रिकेटविश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. श्रीलंकेचा माजी कर्णधार कुसल मेंडिस याला शालेय क्रिकेटच्या काळात प्रशिक्षण देणारे प्रशिक्षक सुमित फर्नांडो यांचा क्रिकेट सामन्यादरम्यान झालेल्या वादानंतर मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे श्रीलंकेच्या क्रिकेट वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सुमित फर्नांडो हे 62 वर्षांचे होते. 8 ऑगस्ट रोजी कोलंबो येथे एका क्रिकेट सामन्यादरम्यान पिण्याच्या पाण्यावरून दोन खेळाडूंमध्ये वाद झाला. पाहता पाहता या वादाचे रूप जोरदार बाचाबाचीत झाले. याचवेळी फर्नांडो हेही त्या वादात सहभागी झाले. त्यांच्यावर कथितरीत्या हल्ला करण्यात आल्याचे समोर आले आहे. घटनेनंतर फर्नांडो यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार केले; मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांना वाचवता आले नाही. उपचारादरम्यान 11 ऑगस्ट रोजी त्यांचा मृत्यू झाला.या प्रकरणात श्रीलंकेच्या पोलिसांनी कारवाई सुरू केली असून 17 वर्षीय अल्पवयीन खेळाडूला 10 ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली. त्याला 11 ऑगस्ट रोजी कोलंबोतील न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने या अल्पवयीन आरोपीला 17 ऑगस्टपर्यंत बाल सुधारगृहात ठेवण्याचे आदेश दिले आहेत. पोलिसांकडून या घटनेचा अधिक तपास सुरू आहे. या प्रकरणात सहभागी असलेल्या इतर खेळाडूंचीही चौकशी केली जात असल्याची माहिती समोर आली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, 8 ऑगस्ट रोजी कोलंबोमध्ये क्रिकेट सामना सुरू असताना पिण्याच्या पाण्यावरून दोन खेळाडूंमध्ये वाद झाला. या वादात सुमित फर्नांडो सहभागी झाले आणि त्यानंतर त्यांच्यावर कथित हल्ला झाला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले होते.सुमित फर्नांडो यांचे श्रीलंकेच्या क्रिकेटमध्ये मोठे योगदान होते. ते मोरातुवा येथील प्रिन्स ऑफ वेल्स कॉलेजचे माजी क्रिकेट प्रशिक्षक होते. या महाविद्यालयात त्यांनी अनेक युवा क्रिकेटपटूंना प्रशिक्षण दिले. श्रीलंकेचा माजी कर्णधार आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील प्रमुख खेळाडू कुसल मेंडिस यालाही त्याच्या सुरुवातीच्या क्रिकेट कारकिर्दीत फर्नांडो यांनी मार्गदर्शन केले होते. त्यामुळे फर्नांडो हे केवळ प्रशिक्षक म्हणून नव्हे, तर अनेक युवा क्रिकेटपटूंच्या कारकिर्दीचा पाया मजबूत करणारे मार्गदर्शक म्हणून ओळखले जात होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles